Sunday, April 26, 2026
Homeतंत्रज्ञानजिओचा 448 रुपयांचा भन्नाट प्लान, तीन महिन्यांची वैधता आणि फायदेही चिक्कार

जिओचा 448 रुपयांचा भन्नाट प्लान, तीन महिन्यांची वैधता आणि फायदेही चिक्कार

जिओ युजरसाठी अनेक नवनवीन रिचार्ज प्लान आणते. यावेळी कंपनीने ज्यांना अनिर्बंध कॉलिंगसाठी वैधता देणारा स्वस्तातला प्लान हवा. त्यांच्यासाठी जिओने ४४८ रुपयांचा एक विशेष ‘व्हॉइस-ओन्ली’ प्लान सादर केला आहे.

 

ज्यांना इंटरनेट पेक्षा व्हॉईस कॉलिंगला प्राधान्य द्यायचेय त्यांच्यासाठी हा प्लान आहे. त्यामुळे वैधतेसह अमर्याद कॉलिंगचा आनंद घेता येतो. त्यांच्यासाठी हा दीर्घकालिन प्लान महत्वाचा आहे.

 

जिओचा हा प्लान जिओच्या अधिकृत वेबसाईट आणि जिओ ॲप या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे, येथे या प्लानची वैधता आणि त्याच्या सर्व फायद्यांविषयी संपूर्ण माहिती मिळेल.

 

जिओच्या या व्हॉईस ओन्ली प्लानमध्ये कॉलिंगच्या सुविधां व्यतिरिक्त तुम्हाला १,००० एसएमस फ्री आहेत. हा प्लान दीर्घ कालावधीचा असल्याने फायदेशीर ठरतो.

 

जिओ या प्लानसोबत ८४ दिवसांची पूर्ण वैधता देते. या प्लानअंतर्गत, तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर कॉल करीत असलात तरी, कंपनी अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा देते. मात्र,या प्लानमध्ये कोणत्याही डेटाचा लाभ मिळत नाही

 

अमर्याद कॉलिंग आणि १,००० एसएमएस सेवा या सोबतच हा प्लान घेणाऱ्यांना इतरही फायदे मिळतात. विशेष म्हणजे या प्लान सोबत जिओ आपल्याय युजरना जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊड या दोन्हींचे मोफत सबस्क्रिप्शन देते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -