Monday, April 27, 2026
Homeमहाराष्ट्रधाड, धाड... डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार, सुरक्षा रक्षकांनी वाचवले; जगात खळबळ

धाड, धाड… डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार, सुरक्षा रक्षकांनी वाचवले; जगात खळबळ

अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन डीसीमधील हिल्टन हॉटेलमध्ये आयोजित ‘व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डंट्स डिनर’ (WHCA) कार्यक्रमात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे.

 

या हल्ल्यानंतर अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तातडीने सुरक्षा कवच देत व्यासपीठावरून सुरक्षित स्थळी हलवले. या घटनेमुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून सुदैवाने ट्रम्प आणि त्यांचे मंत्रिमंडळ सुरक्षित असल्याचे वृत्त ‘सीएनएन’ने दिले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा गोळीबाराचा आवाज आला, तेव्हा व्यासपीठावर ट्रम्प यांच्यासह उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस आणि मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे सदस्य उपस्थित होते. सीक्रेट सर्व्हिसच्या एजंटनी तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवत ‘शूटर’ ओरडत ट्रम्प यांना घेरले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व महत्त्वाचे नेते सुरक्षित आहेत. या हल्ल्याचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नसला तरी, एका संशयित हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

 

विशेष म्हणजे, या घटनेच्या एक दिवस आधी याच हॉटेलच्या भिंतींवर ट्रम्प आणि लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन यांचे फोटो आणि व्हिडिओ प्रोजेक्टरच्या साहाय्याने दाखवण्यात आले होते. या व्हिडिओंमध्ये ट्रम्प प्रशासनावर एपस्टीन प्रकरणातील फाईल्स दाबल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर झालेला हा गोळीबार हा केवळ योगायोग आहे की एखादा नियोजित कट, याचा तपास आता अमेरिकन यंत्रणा करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -