Thursday, May 21, 2026
Homeअध्यात्ममन प्रसन्न करणारे 5 प्रभावी मंत्र, फक्त 10 मिनिटांत सर्व चिंता दूर

मन प्रसन्न करणारे 5 प्रभावी मंत्र, फक्त 10 मिनिटांत सर्व चिंता दूर

आजच्या धकाधकीच्या जीवनाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. ज्यामुळे चिंता, ताण – तणावामुळे आरोग्याला थेट हानी पोहोचते. अशात आनंत आणि शांती मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. तणावाखाली असताना आपण निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ शकतो आणि लोकांना न्याहाळत वेगाने चालू शकतो. आपण शांतपणे बसून, डोळे मिटून, दीर्घ श्वास घेऊ शकतो आणि केवळ त्या श्वासाच्या आवाजावर लक्ष केंद्रित करू शकतो. एवढंच नाही तर, डान्स येत नसले तरी, आपण एखादे उत्साहवर्धक गाणं लावून त्याच्या तालावर ताल धरल्याने चिंता दूर होईल.. असे 5 मंत्र आहेत ज्यामुळे तुम्ही स्वतःला आनंदी ठेऊ शकता.

 

नैसर्गिक वातावरणात चालणे : तणाव असल्यास चार भिंतींच्या आत अडकून राहण्याऐवजी बाहेर येणं चांगलं असतं. नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेत आणि आजूबाजूच्या लोकांचं निरीक्षण करत वेगानं चाला. जेव्हा तुम्ही हिरवेगार वातावरण आणि लोकांच्या हालचाली पाहत वेगानं चालता, तेव्हा मेंदूला होणारा रक्तपुरवठा सुधारतो. केवळ दहा मिनिटांत नकारात्मक विचार नाहीसे झाल्याचं आणि मन ताजेतवाने झाल्याचे तुम्हाला जाणवेल.

 

दीर्घ श्वासोच्छ्वास व्यायाम : श्वासोच्छवासाचे व्यायाम हे तुमच्या मनावर नियंत्रण ठेवण्याचा आणि अनावश्यक विचारांपासून तुमचे लक्ष विचलित करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तुम्हाला फक्त एका शांत ठिकाणी डोळे मिटून बसायचे आहे आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तुमच्या श्वासाचा आवाज तुमच्यासाठी अधिक मोठा होईल. तुमच्या मनाला या गोष्टींवर केंद्रित होऊ द्या. जेव्हा तुम्ही केवळ तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुमचे भरकटणारे मन अचानक एकाग्र आणि शांत होईल.

 

डान्स : संगीत आणि नृत्यामध्ये तणाव कमी करण्याची अविश्वसनीय शक्ती आहे. तुम्हाला नाचता येत नसेल तरी काही फरक पडत नाही. एखादे उत्साहवर्धक गाणं लावा आणि त्याच्या तालावर डान्स करा. गाण्याच्या तालावर शरीर हलवल्याने सर्व अनावश्यक तणाव दूर होईल सुगंधित तेल मालिश : शरीरातील नसा शिथिल करून तुम्ही मनावरचा भार कमी करू शकता. शरीर आणि मनाला सुखद वाटणारा सुगंध असलेलं तेल घ्या आणि ते तुमच्या हातांवर, पायांवर, मानेवर, खांद्यांवर इत्यादी ठिकाणी लावा. या सुगंधी मालिशमुळे आपल्या शरीरातील नसा शिथिल होतील आणि मन हलकं होईल.

 

हास्य : “मोठ्याने हसल्याने आजार बरा होतो” ही केवळ एक म्हण नाही, तर ते एक वैज्ञानिक सत्य देखील आहे. जेव्हा तुम्हाला उदास वाटेल, तेव्हा तुमची आवडती विनोदी फिल्म पाहताना मोठ्याने हसा. जेव्हा तुम्ही मोठ्याने हसता, तेव्हा मेंदू हॅपी हार्मोन्स तयार करतो आणि तुमचं मन शांत होतं. तुमचा मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि शारीरिक आरोग्य टिकवण्यासाठी तुमच्या दैनंदिन जीवनात या पाच सोप्या व्यायामांपैकी कोणताही एक करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -