रांगोळी गावातील तीन तरुणांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शाळेचा निकाल घेण्यासाठी बाहेरगावाहून इचलकरंजीत आलेल्या तिघांचा डंपरला धडकून अपघात झाला. या भीषण अपघातात गणेश कांबळे या युवकाचा मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे रांगोळी गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुरुमाने भरलेला डंपर (एम एच ५१/सी-१२४२) इचलकरंजीकडे जात होता. दुचाकी व डंपरची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील तिघे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यावेळी नागरिकांनी त्यांना उपचारासाठी इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. यामध्ये गणेश कांबळे याचा मृत्यू झाला तर अर्जुन मिरजे याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवले असून त्याची



