Wednesday, May 27, 2026
Homeक्रीडाआरसीबीची सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक, गुजरातचा 92 धावांनी धुव्वा

आरसीबीची सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक, गुजरातचा 92 धावांनी धुव्वा

रजत पाटीदार याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) अंतिम फेरीत धडक दिली आहे. आरसीबीने गुजरात टायटन्सचा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवून फायनलचं तिकीट मिळवलं. आरसीबीने कॅप्टन रजत पाटीदार याने केलेल्या स्फोटक खेळीच्या जोरावर धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये क्वालिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्ससमोर 255 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र या धावांचा पाठलाग करताना गुजरातला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. आरसीबीने गुजरातला 162 धावांवर 19.3 ओव्हरमध्ये गुंडाळलं. आरसीबीची यासह अंतिम फेरीत पोहचण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. तर पराभवानंतरही गुजरातला अंतिम फेरीत पोहचण्याची संधी मिळणार आहे. गुजरातला क्वालिफायर 2 सामन्यात एलिमिनेटरमधील विजेत्या संघासह 2 हात करणार आहे.

 

आरसीबीची बॅटिंग

गुजरातचा कॅप्टन शुबमन गिल याने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीने या संधीचा फायदा घेत प्लेऑफच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. आरसीबीने 5 विकेट्स गमावून 254 धावा केल्या. आरसीबीला इथवर पोहचवण्यात रजत पाटीदार याने प्रमुख भूमिका बजावली.

 

रजतने नाबाद आणि सर्वाधिक 93 धावा केल्या. तर जितेश शर्मा याने नॉट आऊट 15 रन्स केल्या. त्याआधी विराट कोहली आणि कृणाल पंड्या या दोघांनी प्रत्येकी 43 धावांचं योगदान दिलं. देवदत्त पडीक्कल याने 30 धावा जोडल्या. तर वेंकटेश अय्यर 19 रन्स करुन माघारी परतला. गुजरातसाठी कगिसो रबाडा आणि जेसन होल्डर या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर प्रसिध कृष्णा याने 1 विकेट मिळवली.

 

गुजरात आरसीबीसमोर ढेर

आरसीबीच्या गोलंदाजांनी गुजरातला सुरुवातीपासूनच झटके द्यायला सुरुवात केली. त्यामुळे गुजरातच्या 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. जेसन होल्डर आला तसाच झिरोवर गेला. साई सुदर्शन याने 14 आणि जोस बटलर याने 29 धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या क्षणी राहुल तेवतिया याने 68 धावांची खेळी करुन गुजरातची लाज राखली. राहुलने केलेल्या या खेळीमुळे गुजरातला मोठा पराभव टाळण्यात यश मिळालं. आरसीबीसाठी जेकब डफी याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. भुवनेश्वर कुमार,रसिख सलाम डार आणि कृणाल पंड्या या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर जोश हेझलवूड याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -