Thursday, May 28, 2026
Homeमहाराष्ट्रआंतरजातीय प्रेमविवाह, पुण्यात संसार थाटला, मग गावी जाऊन हॉटेल उभारलं, रीलस्टार रोहिणीने...

आंतरजातीय प्रेमविवाह, पुण्यात संसार थाटला, मग गावी जाऊन हॉटेल उभारलं, रीलस्टार रोहिणीने आयुष्य का संपवलं?

राज्यातील प्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर रोहिणी पाराध्ये हिने मंगळवारी मंगळवेढा तालुक्यातील ‘हॉटेल ग्रामपंचायत’ येथे गळफास लावून आत्महत्या केली.या घटनेमुळे सोशल मिडिया आणि मंगळवेढा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. रोहिणी पाराध्ये (Rohini Paradhye )आणि निलेश पाराध्ये (Nilesh Paradhye) हे जोडपे त्यांच्या इन्स्टाग्रामवरील रिल्समुळे प्रचंड लोकप्रिय होते. त्यांच्या इन्स्टाग्रामवरील (Instagram) मजेशीर रिल्स अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायच्या. मात्र, त्याच रोहिणी पाराध्ये हिने आयुष्य संपवण्याचा इतका टोकाचा निर्णय का घेतला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत सोशल मिडीयावर उलटसुलट चर्चा सुरु आहेत. रोहिणी पाराध्ये ही अवघ्या 25 वर्षांची होती. सध्या मंगळवेढा पोलीस रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्याप्रकरणाचा तपास करत आहेत. तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी यासाठी व्यवसायातील अपयश किंवा कौटुंबिक वाद कारणीभूत असण्याची प्राथमिक शक्यता आहे. (Maharashtra Crime news)

 

रोहिणी आणि तिचे पती निलेश यांचा प्रेमविवाह झाला होता. आंतरजातीय विवाह करून हे दोघेही पुणे येथे काही काळ वास्तव्य करत होते. पुणे इथे असतानाच हे दोघेही रील करू लागले. यानंतर आपल्या मूळ गावी परतल्यानंतर त्यांनी ‘हॉटेल ग्रामपंचायत’ नावानं हॉटेल व्यवसाय सुरू केला. हॉटेलमधील रोजच्या खेळीमेळीच्या वातावरणातील रील बनवून रोहिणी आणि निलेश दोघेही प्रसिद्ध झाले आणि त्यांचं हॉटेलही यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचलं.

 

याच काळात त्यांनी मंगळवेढा तालुक्यातच दोन ठिकाणी नव्यानं हॉटेलच्या शाखा सुरू केल्या. मात्र, या दोन्ही शाखांचं व्यवस्थापन करणं, जिकरीचं होत असतानाच. आर्थिक घडी नीट बसवणं आणि शाखा चांगल्या चालवणं, अशा गोष्टींची तारेवरची कसरत होत होती. यातूनच दोघांत वाद आणि तणाव निर्माण झाल्याची चर्चा आहे. रोहिणीनं हे टोकाचं पाऊल उचललं असावं अशी चर्चा आहे. महत्वाचं म्हणजे, रोहिणीचा निलेश सोबतच दुसरा विवाह असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नीलेशसोबत प्रेमविवाह झाल्यावर नक्की कुठल्या कारणानं तिनं हे टोकाचं पाऊल उचललं? नक्की दोघांमधील मतभेद होता की, अन्य कुठलं वेगळं कारण होतं का? याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. मात्र याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस आता आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -