Tuesday, June 2, 2026
Homeइचलकरंजीमाजी आम.हाळवणकरांच्या वाढदिवसानिमित्त गंगा आरती

माजी आम.हाळवणकरांच्या वाढदिवसानिमित्त गंगा आरती

भाजपाचे लोकप्रिय नेते माजी आम. सुरेशराव हाळवणकर यांच्या २ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत ३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता श्री साईप्रसाद ग्रुपच्यावतीने पंचगंगा नदी घाटावर महायज्ञ तसेच गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थापक सुनिल महाजन व विनय महाजन यांनी दिली.

 

शहरात प्रथमच असा एक वेगळा उपक्रम साजरा होत आहे, असे सांगून महाजन यांनी वस्त्रनगरीच्या समृध्दीसाठी आणि सुरेशराव हाळवणकर यांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी गंगा आरतीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.

हरिद्वार येथे ज्या पध्दतीने गंगा आरती केली जाते, त्याच पध्दतीने पंचगंगा नदी तिरावर गंगा आरतीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर आतषबाजी करण्यात येणार आहे. गंगा आरतीसाठी हरिद्वार येथून आणि महायज्ञासाठी राजस्थान येथून पुरोहित येणार आहेत. यासाठी पंचगंगा नदी घाटावर विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सर्वांचाच सहभाग असावा या हेतूने महायज्ञाकरीता शहरातील प्रत्येक घरातून स्व इच्छेने मुठभर धान्य समिधा म्हणून एकत्र करण्यात येणार आहे. त्यास सहकार्य करण्याबरोबरच कार्यक्रमासाठी नागरिकांनी घाटावर सायंकाळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाजन यांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -