Friday, June 5, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजी:जादा नफ्याच्या आमिषाने सव्वा दोन कोटीचा गंडा ४८ जण फसले; दोघांवर गुन्हा

इचलकरंजी:जादा नफ्याच्या आमिषाने सव्वा दोन कोटीचा गंडा ४८ जण फसले; दोघांवर गुन्हा

शेअर मार्केटमधील गुंतवणूकीतून दरमहा ८ टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून ४८ जणांची २.२५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात इचलकरंजीतील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहसीन कादर मणेर (वय ४० रा. आयकॉन पार्क आमराई रोड) व मुदस्सर जमीर मकानदार (वय ३०) अशी त्यांची नावे बर) आहेत. या प्रकरणी व्यंकटरमण

 

ओमप्रकाश शिरापूरम (वय ३५ रा. सुगंधा पाटील मळा) यांनी फिर्याद दिली आहे.

 

मोहसीन मणेर व मुदस्सर मकानदार यांनी फिर्यादीसह ४८ जणांना शेअर मार्केटमधील गुंतवणूकीतून दरमहा ८ टक्के प्रमाणे नफा बँक खात्यावर जमा करतो असे सांगत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करुन घेतली. सर्वांनीच जादा नफ्याच्या आमिषाने वेळोवेळी ऑनलाईन, आरटीजीएस, चेक स्वरुपात मोठ मोठ्या रक्कमा दिल्या. परंतु त्यातून काहीच नफा

 

अथवा गुंतवलेली रक्कम मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. मागील सहा महिन्यांपासून सर्वजण गुंतवणूक केलेल्या रकमा परत मिळाव्यात यासाठी जात आहेत. परंतु डिसेंबर २०२५ पासून मोहसीन मणेर हा आपल्या कुटुंबासह परागंदा झाला आहे. त्याचा मोबाईलही बंद असून त्याचे कार्यालयही बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे फसवणूक झाल्याने फिर्यादी शिरापूरम यांच्यासह सर्वांनी पोलिस अधिक्षकांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार चौकशीअंती अप्पर पोलिस अधिक्षक यांच्या आदेशाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -