Homeइचलकरंजीइचलकरंजी पॉवरलूम असो.चा प्रवेश कर आकारण्यास विरोध

इचलकरंजी पॉवरलूम असो.चा प्रवेश कर आकारण्यास विरोध

कोल्हापूरात बाहेरून येणाऱ्या वाहनांवर प्रवेश कर आकारण्यास इचलकरंजी पॉवरलूम असो. ने विरोध केला आहे. याबाबत इचलकरंजी महापालिकेचे महापौर आणि आयुक्त यांना निवेदन दिले आहे.

 

इचलकरंजी हे औद्योगिक शहर असून खासकरून यंत्रमाग उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. जी.एस.टी., जिल्हा उद्योग केंद्र, महसुल विभाग, प्रदुषण नियंत्रण

मंडळ, भूमापण, आयकर, जिल्हाधिकारी कार्यालयासह महावितरण विभागीय कार्यालय, सर्व बँकांचे विभागीय कार्यालय, चेंबर ऑफ कॉमर्स कार्यालये कोल्हापूरात आहे.

 

त्यामुळे येथील उद्योजकांचे वारंवार कोल्हापुरला ये-जा सुरु असते. तसेच इचलकरंजीला नव्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू झाल्याने येथील गाड्यांवर एमएच ५१ पासिंग असल्यामुळे अशा गाड्यांवर प्रवेश कर आकारल्यास इचलकरंजीतील उद्योजकांना तो नवा भुर्दंड बसणार आहे.

 

जिल्ह्यातीलच नागरिक असताना देखील त्यांना वेगळा प्रवेश कर द्यावा लागेल. त्यामुळे इचलकरंजी पॉवरलूम असो. ने कोल्हापुरात प्रवेश कर आकारण्यास विरोध केला आहे.

 

त्याचबरोबर इचलकरंजीतून मोठ्या प्रमाणात पर्यटनासह विविध कारणांनी नागरिकही कोल्हापुराला जात असतात. त्यामुळे सर्व बाबींचा

विचार करून प्रवेश कर आकारण्याचा विषय महापालिकेच्या महासभेतून वगळण्याची मागणी असो.चे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -