कोरोची लोकमान्य नगर विद्यामंदिर येथे जिल्हा परिषद सदस्या सानिका आवाडे- यड्रावकर यांनी स्वतः शिक्षण अधिकाऱ्यांना भेटून शासनाने शाळेला पूर्वी ७०% पाठ्यपुस्तके दिले होती पण अवघ्या पाच तासात उरलेली ३०% पाठ्यपुस्तके शाळेत स्वतः येऊन सुपूर्द केली.
कोरोची लोकमान्य नगर विद्यामंदिर येथे सोमवारी सर्व ठिकाणी जिल्हा परिषद शाळा सुरू करण्यात आल्या यासाठी जिल्हा परिषद सदस्या सौ सानिका आवाडे -यड्रावकर या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आल्या होत्या यावेळी मुख्याध्यापकांकडून माहिती घेतली असता शासनाकडून ७०% पाठ्यपुस्तके आली आहेत पण उरलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावेत म्हणून कार्यक्रम होताच शिक्षण अधिकारी यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून स्वतः आपल्या गाडीतून पाठ्यपुस्तके अवघ्या पाच तासात मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूर्द केले. व माझ्या जिल्हा परिषद शाळा या मोठ्या झाल्या पाहिजेत मी शाळेला काहीच कमी पडू देणार नाही शाळेसाठी तुम्ही फक्त सांगा आम्ही झटक्यात काम करू असे पाठ्यपुस्तक देताना बोलत होत्या.
यावेळी पंचायत समिती सदस्य सनी ओहूळकर, माजी सरपंच मनोहर खारकांडे, ग्रामपंचायत सदस्य शितल पाटील, सौरभ पाटील, गो.गा. बांधार उपस्थित होते.





