डिसेंबर २०२५ मध्ये पार पडलेल्या हुपरी नगरपरिषद निवडणुकीतील भाजपच्या प्रभाग क्र. ९ मधील नगरसेविका सौ. माधुरी सुनील मुधाळे यांचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीत अवैध माधुरी मुधाळे ठरले आहे.
या निवडणुकीतील पराभूत उमेदवार सौ. श्रुती सचिन मुथाळे यांनी माधुरी मुधाळे यांच्या जातीच्या दाखल्यावर अधिकृत आक्षेप घेतला होता.
राखीव होती. ह्या प्रभागातील एक जागा ओबीसी महिला गटासाठी या जागेवर माधुरी मुधाळे यांनी भटक्या जमाती-क प्रवर्गातून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्यांच्याविरोधात सौ. श्रुती सचिन मुथाळे यांनी निवडणूक लढवली होती.
निवडणूक प्रक्रिया दरम्यान श्रुती मुथाळे यांनी माधुरी मुधाळे यांच्या जातीच्या दाखल्यावर आक्षेप नोंदवला होता. जात पडताळणी समितीच्या अंतिम छाननीमध्ये माधुरी मुधाळे यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. ह्या निर्णया विरोधात मुधाळे या उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात प्रभाग ९ मध्ये काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





