नांदणी (ता. शिरोळ) येथील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी प्रशासकीय आणि स्थानिक पातळीवर वेग आला आहे. माधुरीच्या निवासाची सोय व सुविधा तपासण्यासाठी गुजरात येथील वनताराची टीम नांदणीत दाखल झाली आहे.
नांदणी मठ आणि वनतारा फाउंडेशनच्या वतीने हत्तीच्या निवासाची सोय व सुविधा उभारण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर याचा अहवाल उच्च स्तरीय समितीकडे सादर केला जाईल आणि त्यानंतर माधुरीच्या घर वापसीचा मार्ग मोकळा होणार आहे.
वनताराच्या पथकाने नांदणीत येत निवासाच्या कामाची पाहणी सुरू केली आहे.
स्वाभिमान निधी योजना: लाडकी बहीण योजनेप्रमाणे महिलांना मिळणार दरमहा 2000 रुपये?
सध्या अस्तित्वात असलेल्या शेड परिसरात सुविधा उभारले जात आहेत. हत्तीला शॉवर आणि कूलरची व्यवस्था, फिरण्यासाठी रस्त्यावर वाळू, सुरक्षेसाठी दोन्ही बाजूंना जाळी आणि झाडे लावण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर उपचार केंद्र उभारले जात आहे. हे काम लवकरच पूर्ण होणार असून त्याचे चित्रीकरण उच्चस्तरीय समितीला दिले जाईल. समितीच्या मंजुरीनंतरच माधुरी नांदणीत दाखल होईल.
अत्याधुनिक माधुरी वाडा नांदणी मठाच्या सहा एकर जागेत नियोजित असलेल्या भव्य माधुरीवाड्यामध्ये अत्याधुनिक सुविधांचा समावेश असणार आहे. ऐतिहासिक वारसा दर्शविणारे भव्य प्रवेशद्वार आणि सावलीसाठी मोठे शेड आरोग्य व उपचार केंद्र, पाणी व खाद्य सुरक्षा व पर्यटन यासह कर्मचारी व्यवस्था देखील केली जाणार आहे.





