Homeइचलकरंजीइचलकरंजी : भरधाव कारची बसला धडक; एक ठार, पाच जखमी

इचलकरंजी : भरधाव कारची बसला धडक; एक ठार, पाच जखमी

येथील शिवतीर्थ  नजीकच्या मध्यवर्ती  बस स्थानकात भरधाव कार थेट गर्दीत घुसल्याने झालेल्या अपघातात एका वृध्देचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाचजण जखमी झाले. इतर प्रवाशांनी केलेल्याआरडाओरडामुळे अनेकांचे जीव वाचले. नंदा वसंत कोळी (६५, रा. कुंभोज, ता. हातकणंगले) असे मृत महिलेचे नांव आहे.

सरकार लाडक्या भावांच्या बँक खात्यात टाकणार १५००० रुपये, काय आहे नवी योजना?

महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना १ हेक्टर जमीन, १ लाखांचे अनुदानही मिळणार, काय आहे नवी योजना?

भरधाव कार (क्र. एमएच ४३/एएन २२२१) बसस्थानकावर थांबलेल्या एस.टी. (क्र. एमएच २०/जीसी ३४८८) वर जाऊन जोरात आदळली. घटनेनंतर कार चालकाने तेथून पळ काढला तर दुसराच एक युवक मीच चालक असल्याचे सांगू लागल्याने जखमींसह संतप्त नागरिकांनी मोटारीवर लाथा मारत संताप व्यक्त केला.

भरदुपारी घडलेल्या घटनेमुळे बसस्थानकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या अपघात प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात सतिश भिमराव कुऱ्हाडे (रा. सुतार मळा, इचलकरंजी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -