Homeइचलकरंजीइचलकरंजी : आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुलावर गुन्हा

इचलकरंजी : आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुलावर गुन्हा

निष्काळजीपणे वाहन चालवून आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात प्रकाश चोखा दामले (वय ४७ मूळ रा. कारदगा ता. निपाणी सध्या आळंद जि. कलबुर्गी) या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक फौजदार अविनाश मुंगसे यांनी फिर्याद दिली आहे. हा अपघात ३० एप्रिल २०२६ रोजी पार्वती औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वारासमोर घडला होता.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, प्रकाश दामले हे आपली आई सी. काशीचाई चोखा दामले (वय ६३ रा. कारदगा ता. निपाणी) यांना दुचाकीवरुन (केए २३ ईएम ०८२२) वरुन घेऊन जयसिंगपूरहून इचलकरंजीच्या दिशेने येत होते. भरधाव वेगाने येत असताना पार्वती औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या रस्त्यावरील स्पीड ब्रेकरनजीक प्रकाश यांनी अचानकपणे ब्रेक मारला. त्यामुळे पाठीमागे बसलेल्या त्यांच्या आई काशीबाई या दुचाकीवर पडून रस्त्यावर आपटल्या, त्यामध्ये त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. निष्काळजीपणे वाहन चालवून आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेप्रकरणी प्रकाश दामले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -