कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याने नृसिंहवाडीमधील दत्त मंदिर प्रशासन अलर्ट झालं झालं आहे. नदीकडील सर्व साहित्य सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. मंदिराच्या सभामंडपापर्यंत पाणी पोहोचल्याने भाविकांना नदीकाठी जाऊ दिले जात नाही.
299 बंधाऱ्यांपैकी 48 बंधारे पाण्याखाली
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात सद्यस्थितीत रेल्वे वाहतूक पूर्णपणे सुरळीत असून कोणतीही रेल्वे सेवा विस्कळीत झालेली नाही. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस कोणताही अडथळा नाही. मात्र अतिवृष्टीमुळे 3 राज्यमार्ग, 5 प्रमुख जिल्हा मार्ग, 8 ग्रामीण मार्ग आणि 2 इतर जिल्हा मार्ग असे एकूण 18 रस्ते वाहतुकीसाठी बाधित झाले आहेत. संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे पाणीपातळी 33 फूट 3 इंच, शिरोळ बंधारा येथे 40 फूट 3 इंच आणि नृसिंहवाडी येथे 36 फूट असून तिन्ही ठिकाणी नदीची पाणीपातळी इशारा पातळीपेक्षा खाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागात सध्या कोणताही तातडीचा पूरधोका निर्माण झालेला नाही.
जिल्ह्यातील 299 बंधाऱ्यांपैकी 48 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणामध्ये 41 टक्के पाणीसाठा असून धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद आहेत. तुळशी धरणात 41 टक्के, वारणा धरणात 28 टक्के आणि दूधगंगा धरणात 13 टक्के पाणीसाठा आहे. वारणा व दूधगंगा धरणातून प्रत्येकी 100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका आणि चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. हरिपूर जवळ कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा संगम होतो . या ठिकाणी कृष्णा नदीपेक्षा वारणा नदीचा प्रवाह जास्त दिसून येत आहे. वारणा नदी पात्राबाहेर पडल्यामुळे विस्तीर्ण होऊ लागली आहे.
1. पंचगंगा नदी (एकूण 7 बंधारे)
शिंगणापूर
राजाराम
सुर्वे
रुई
इचलकरंजी
तेरवाड
शिरोळ
2. भोगावती नदी (एकूण 4 बंधारे)
सरकारी कोगे
हळदी
खडक कोगे
राशिवडे
३. तुळशी नदी (एकूण 2 बंधारे)
कसबा बीड
आरे
4. कासारी नदी (एकूण 7 बंधारे)
यवलूज
ठाणे आळवे
पुनाळ तिरपण
बाजार भोगाव
वालोली
काटे
पेंडाखळे
5. कुंभी नदी (एकूण 5 बंधारे)
शेणवडे
कळे
सांगरुळ
मांडुकली
शेणवडे
6 . वेदगंगा नदी (एकूण 10 बंधारे)
कुरणी
बस्तवडे
चिखली
निळापण
वाघापूर
सुरुप्ली
गारगोटी
म्हसवे
करडवाडी
शेणगाव
7. कडवी नदी (एकूण 3 बंधारे)
कोपार्डे
सवतेसावर्डे
सरूडपाटणे
8. वारणा नदी (एकूण २ बंधारे)
कोडोली
मांगलेसावर्डे
9. दुधगंगा नदी (एकूण 2 बंधारे)
सिध्दनेर्ली
दत्तवाड
10. हिरण्यकेशी नदी (एकूण 1बंधारा)
साळगाव
11. घटप्रभा नदी (एकूण 1बंधारा)
कानडी सावर्डे

