सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने मोठी घोषणा केलेली आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलतीत (DR) ३ टक्के वाढ मंजूर केली आहे. हा वाढीव भत्ता १ जुलै २०२६ पासून लागू होणार आहे.
या निर्णयाचा देशातल्या १.१६ कोटींहून जास्त केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. दिवाळीमध्ये हे सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट देण्यात आलं आहे.



