शाओमीचा सब-ब्रँड असलेल्या रेडमीने आपल्या के१०० सीरिजमधील स्टँडर्ड मॉडेल रेडमी के१०० लॉन्च केले आहे. गेमिंगची आवड असणाऱ्यांसाठी हा फोन एक उत्तम पर्याय ठरणार असून, यात १०,०००mAh ची प्रचंड बॅटरी देण्यात आली आहे.
कंपनीने हा स्मार्टफोन मिड-बजेट सेगमेंटमध्ये सादर केला असून, यात क्वालकॉमचा शक्तिशाली फ्लॅगशिप प्रोसेसर वापरण्यात आला आहे. सध्या हा स्मार्टफोन चीनच्या बाजारपेठेत लॉन्च करण्यात आला असून, भारत आणि इतर जागतिक बाजारपेठांमध्ये हा फोन पोको एफ सीरिज अंतर्गत लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे.
हा फोन १२ जीबी+ २५६ जीबी स्टोरेज, १२ जीबी+ ५१२ जीबी स्टोरेज आणि १६ जीबी+ ५१२ जीबी स्टोरेज अशा तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. हा फोन ब्लॅक, स्नो रॉक व्हाईट आणि फायरफ्लाय ग्रीन अशा तीन रंगात लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन येत्या ३१ ऑक्टोबर २०२६ पासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
रेडमी के१००: किंमत
१२ जीबी+ २५६ जीबी स्टोरेज: ३,४९९ युआन (सुमारे ५०,००० हजार रुपये)१२ जीबी+ ५१२ जीबी स्टोरेज: ४,०९९ युआन (सुमारे ५८,५४० हजार रुपये)१६ जीबी+ ५१२ जीबी: ४,४९९ युआन (सुमारे ६४,००० हजार रुपये)
रेडमी के१००: फीचर्स
डिस्प्ले: या फोनमध्ये ६.८३ इंच चा फ्लॅट OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो १६५Hz रिफ्रेश रेट आणि २७७२ x १२८० पिक्सेल रेझोल्यूशनला सपोर्ट करतो. यात HDR10+, डॉल्बी व्हिजन आणि ३५०० निट्सची पीक ब्राईटनेस मिळते.
प्रोसेसर आणि परफॉर्मन्स: गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी यात Qualcomm Snapdragon 8 Elite चिपसेट देण्यात आला आहे. तसेच, फोन गरम होऊ नये म्हणून यात 3D वेपर चेंबर कूलिंग सिस्टम दिली आहे. हा फोन Android 17 आधारित HyperOS 4 वर काम करतो.
बॅटरी आणि चार्जिंग: फोनची सर्वात मोठी ताकद म्हणजे याची १०,०००mAh बॅटरी, ज्याला १००W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
कॅमेरा: फोटो आणि व्हिडिओसाठी मागच्या बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ५०MP चा मुख्य (OIS) सेन्सर आणि ८MP चा अल्ट्रा-वाईड सेन्सर समाविष्ट आहे. सेल्फीसाठी २०MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
सुरक्षा आणि रेटिंग: हा फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी IP66, IP68, IP69 आणि IP69K रेटिंगसह येतो.



