कनिष्ठ लिपीक महिलेला लाच घेताना अटक;

पुणे येथे प्रवास भत्ता मंजुर करण्यासाठी कर्मचार्यांकडून 3 हजार 400 रूपयांची लाच घेणार्या मुळशीतील एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ लिपीक महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
सीमा विद्याधर विपट (वय 47) असे अटक केलेल्या लिपीक महिलेचे नाव आहे. याप्रकरणी 26 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार पौड पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प कार्यालयात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. पुणे जिल्हा परिषेदेच्या अंतर्गत या विभागाचे काम चालते. या ठिकाणी विटप या कनिष्ठ लिपीक म्हणून काम करतात. तक्रारदार यांनी प्रवास भत्ता बील मंजुरीसाठी अर्ज केला होता. हे बील मंजूर केल्याचा मोबदला म्हणून विपट यांनी तक्रारदार यांच्याकडे टक्केवारीनुसार तीन हजार 450 रूपयांची लाच मागितली होती.
परंतु, लाच देणे तक्रारदारांना मान्य नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी विपट यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार कार्यालय परिसरात लाच घेताना विपट याना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली. अपर पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Join our WhatsApp group