कोरोनाच्या भीतीने दाम्पत्याने संपवली जीवन; मृत्युआधी पोलिसांना पाठवला भावनिक मेसेज

काही भागांमध्ये कोरोनाची दुसरी लाट अजूनही आटोक्यात आलेली नाही. याचदरम्यान आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका 40 वर्षाच्या व्यक्तीनं आणि त्याच्या पत्नीनं कोरोनाची लक्षणं दिसताच भीतीनं आत्महत्या केली आहे. हि घटना कर्नाटकमधील आहे. या दोघांनी आत्महत्या करण्याआधी मंगळुरु पोलिसांना एक व्हॉईस मेसेजही पाठवला होता. या जोडप्याचे नाव रमेश आणि गुना आर सुवर्णा असे आहे. ते मंगळुरुमधील अपार्टमेंटमध्ये राहत होते.

हाती आलेल्या माहितीनुसार, दोघांमध्येही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणं दिसत होती. आत्महत्या करण्याआधी या जोडप्यानं पोलीस कमिशनरला व्हॉईस मेसेज पाठवला होता. या मेसेजमध्ये या दाम्प्त्यानं म्हटलं होतं, की मीडियामध्ये कोरोना व्हायरसंदर्भात येणाऱ्या बातम्यांमुळे ते घाबरले आहेत आणि याच कारणामुळे ते आपलं जीवन संपवत आहेत. यानंतर पोलीस कमिशनरने या जोडप्याला कोणतंही चुकीचं पाऊल न उचलण्याचा सल्ला दिला होता.

पोलीस या जोडप्याच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचण्याच्या आधीच त्यांनी आत्महत्या केलेली होती. अपार्टमेंटमध्ये महिलेनं लिहिलेली एक सुसाईड नोटसुद्धा पोलिसांना सापडली आहे. यामध्ये तिने आपल्या तेरा दिवसांच्या बाळाच्या मृत्यूबद्दलही लिहिलं होतं आणि यामुळेही ती दुखी असल्याचे तिने सांगितलं होतं. तसेच हेदेखील लिहिले कि की महिलेला मधुमेहाचाही भरपूर त्रास आहे. तिला दिवसाला इन्सुलिनचे दोन इंजेक्शन घ्यावे लागत होते.

Leave a Reply

Join our WhatsApp group