उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या आई सावित्री देवी (Savitri Devi) यांचे निधन झाले आहे. त्या ९१ वर्षांच्या होत्या. उत्तराखंडमधील पौरी गढवाल (Garhwal) जिल्ह्यातील पंचूर गावात वयोमानानुसार झालेल्या आजारामुळे त्यांचे निधन झाले
सावित्री देवी उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर ब्लॉकमधील पंचूर गावात राहत होत्या. हे योगी आदित्यनाथ यांचे मूळ गाव असून, त्यांच्या कुटुंबाचा या गावाशी जवळचा संबंध आहे. (Savitri Devi)
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा जन्म उत्तराखंडमध्ये झाला आणि त्यांचे बालपण पंचूर गावात गेले. मे २०२२ मध्ये, योगी आदित्यनाथ यांनी बऱ्याच कालावधीनंतर आपल्या वडिलोपार्जित गाव पंचूरला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी आपल्या आई, सावित्री देवी यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री योगींनी आपल्या आईचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर, जून २०२४ मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तराखंडलाही भेट दिली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयाला भेट दिली, जिथे त्यांच्या आई सावित्री देवी दाखल होत्या. मुख्यमंत्री योगींनी आपल्या आईची भेट घेतली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि डॉक्टरांकडून त्यांच्या आरोग्याविषयी माहिती घेतली.
दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचं २० एप्रिल २०२० साली निधन झालं होते. त्यावेळी देशभरात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने योगी आदित्यनाथ वडिलांच्या अंत्यविधीमध्ये सहभागी होऊ शकले नव्हते. कोरोनामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारास अनुपस्थित राहण्यात योगींनी नकार दिला होता.
