जिओला लवकरच 10 वर्षे पूर्ण होणार आहेत. या निमित्ताने त्याने ग्राहकांसाठी बंपर ऑफर आणली आहे. आता ग्राहकांना 15 रूपयांत रिचार्ज करता येणार आहे. हॅप्पी न्यू इयर या नावाने नवीन प्लॅन आणले असून त्यात 399 आणि 3,999 रूपयांच्या रिचार्जचा समावेश आहे. या दोन्ही रिचार्जमध्ये अनलिमिटेड 4G आणि 5G डेटाही मिळणार आहे.
फक्त 15 दिवसांत एक दिवस अनलिमिटेड 5G :जास्त इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी Jio ने दोन छोटे अॅड ऑन पॅक आणले आहेत. 15 रूपयांच्या पॅकमध्ये एका दिवसासाठी, तर 25 रूपयांच्या पॅकमध्ये दोन दिवसांसाठी अनलिमिटेड 5G डेटा मिळेल.
रात्री इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी 50 रूपयांचा पॅक : रात्री उशिरापर्यंत इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी 50 रूपयांचा नाईट डेटा पॅकही आणण्यात आला आहे. या पॅकची वैधता 28 दिवस असेल. दररोज रात्री 12 ते पहाटे 5 या वेळेत अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा वापरता येईल. हा डेटा मुख्य डेटा मधून कट होत नाही.
399 रूपयांच्या प्लॅनमध्ये काय मिळणार? : जिओचा 399 रूपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह आहे. यामध्ये अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100MMS मिळतील. यासोबत 12 महिन्यांचे CANV, JIO HOTSTAR, JIOGAMES आणि जिओ क्लाऊडवर 50GB स्टोरेज मिळणार आहे.
