Homeमहाराष्ट्रदिग्दर्शन आणि अभिनयात छाप पाडल्यानंतर प्रसाद ओक यांचे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण; नव्या...

दिग्दर्शन आणि अभिनयात छाप पाडल्यानंतर प्रसाद ओक यांचे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण; नव्या सिनेमाची घोषणा

मराठी नाटकांपासून ते सिनेमांपर्यंत आपल्या अभिनयाचां आणि दिग्दर्शनाचा ठसा उमटवणारा अभिनेता प्रसाद ओक आता हिंदी चित्रपटसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. आजवर विविध भूमिकांमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणारा प्रसाद ओक आता एका हिंदी सिनेमात दिसणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘सायबर – द बिगिनिंग ‘ असं आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून प्रसाद ओकला हिंदी सिनेमात कोणत्या भूमिकेत पाहायला मिळणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

 

प्रसाद ओकने मराठी मनोरंजन विश्वात अभिनेता आणि दिग्दर्शक अशा दोन्ही भूमिका प्रभावीपणे पार पाडल्या आहेत. फर्जंद, आणि….डॉ. काशिनाथ घाणेकर, स्माईल प्लीज, धुरळा आणि पिकासो यांसारख्या चित्रपटांतून त्याने अभिनयाची वेगवेगळी रूपं दाखवली. मात्र धर्मवीर चित्रपटातील स्वर्गीय आनंद दिघे यांची भूमिका त्याच्या कारकिर्दीतील विशेष गाजलेल्या भूमिकांपैकी एक ठरली. या भूमिकेला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती.

 

अभिनयासोबतच प्रसादाने दिग्दर्शकाने म्हणूनही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या कच्चा लिंबू या चित्रपटाला 65 व्या राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. याशिवाय ‘हिरकणी’ आणि ‘चंद्रमुखी’ या चित्रपटांचंही त्याने दिग्दर्शन केलं आहे.

 

सायबर – द बिगिनिंग’ मध्ये कोणकोणते कलाकार

या चित्रपटाचं दिग्दर्शन आलोक नाईक करत असून राज झकेरियास यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. प्र्साद ओकसोबत या सिनेमात झैन खान दुर्रानी, तारे जमीन पर फेम दर्शील सफारी, कबीर दुहान सिंग, राहूल सिंग,आलीशा खान, आयुष त्यागी, सौम्या श्रीवास्तव , अजित कोश्य आणि विठ्ठ्ल काळे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. गोपी सुंदर यांनी संगीत दिलं असून, अनिरुद्ध चॅटर्जी यांनी पटकथा लिहिली आहे.

 

प्रसाद ओकची भूमिका काय असणार ?

‘सायबर – द बिगिनिंग’ हा वेगळ्या विषयावर आधारित चित्रपट असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र प्रसाद ओक या सिनेमात कोणती भूमिका साकारणार, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने भुरळ घालणार प्रसाद हिंदी चित्रपटात कोणत्या नव्या अंदाजात दिसणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -