Friday, March 29, 2024
Homeइचलकरंजीकोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू ; सर्व राजकीय पक्षांनी...

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू ; सर्व राजकीय पक्षांनी शक्ती प्रदर्शन व रॅली काढत अर्ज भरला

कोल्हापूर जिल्ह्यातील हातगणंगले तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झाली आहे गेल्या चार दिवसापासून निवडणूक आयोगाने ऑनलाईन उमेदवार आज भरण्यासाठी मुभा दिली होती पण उमेदवारी अर्ज भरताना सर्वर डाऊन चा प्रॉब्लेम होत असल्यामुळे सर्व राजकीय नेत्यांनी ऑफलाईन अर्ज घ्यावे अशी मागणी केली होती आज शेवटच्या दिवशी निवडणूक आयोगांनी ऑफलाईन अर्ज भरण्याची मुभा दिली होती त्यामुळे आज हातकणंगले तहसील कार्यालयावर उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

कोणी वाजत गाजत तर कोणी मोटरसायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शन करून आज हातगणंगले तहसीलदार कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे हातगणंगले तालुक्यामध्ये 39 ग्रामपंचायत ची रणधुमाळी सुरू झाली आहे यामध्ये महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य आघाड्या शिवसेना भाजप मनसे आरपीआय काँग्रेस राष्ट्रवादी यासारख्या ग्रामपंचायत मध्ये स्थानिक आघाडी पाहायला मिळत आहेत पण सध्या गटतट बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन बिनविरोध कशी निवडणूक होईल याकडे नेत्यांनी कौल दिला आहे पण ग्रामपंचायत निवडणूक म्हंटले कि स्थानिक गटातटाचे राजकारण मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे काहींनी स्थानिक स्वराज्य आघाड्या पक्षाला बाजूला ठेवून ग्रामपंचायत निवडणुका लढवत असताना सध्या उमेदवार दिसू लागलेत तसेच जनतेतून थेट सरपंच ही निवडण्यात येणार आहे.

यासाठीही सध्या गावोगावी मोठी चुरस पाहायला मिळत आहे सध्या 39 ग्रामपंचायतीची निवडणूक रणधुमाळी थेट जनतेतून सरपंच तसेच सदस्य निवडून येणार आहेत त्यामुळे सर्वच पक्ष आपल्या उमेदवाराला कसे निवडून आणण्याच्या तयारीत लागल्या आज अंतिम दिवस असल्यामुळे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यास उमेदवारांनी तहसील कार्यालयावर मोठी गर्दी केली होती यावेळी काही उमेदवार तहसील कार्यालय मध्ये खांद्यावर बसून त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती पण काही हौशी उमेदवार खांद्यावर बसले असताना खाली पडल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले त्यामुळे उमेदवार निवडून यायच्या अगोदर पडल्यामुळे त्या उमेदवाराचे तहसील कार्यालयावर चर्चेचा विषय बनला होता त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये उमेदवारांना उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत देण्यात आली आहे त्यानंतरच 39 ग्रामपंचायत मध्ये कोण कोणता उमेदवार कुठल्या गटातून उभा राहणार हे समजणार आहे स्थानिक ग्रामपंचायत बिगुल वाजणार आहे कोण उमेदवार निवडून येणार जनता कोणाला कौल देणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले आज हातकणंगले तहसील कार्यावर उमेदवारी भरण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केली तर युवा वर्गाने मोदींना पसंती दिली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -