गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा; महिलांनी दिला दांडक्यांने चोप

लावणी क्वीन म्हणून सध्या प्रसिद्ध असणारी गौतमी पाटील वेगवेगळ्या कारणांसाठी गाजते आहे. गौतमी पाटील हे नाव आता महाराष्ट्राला नवं राहिलेलं नाही. गौतमीच्या नृत्याचे जितके चाहते आहेत, तितकेच तिच्या सौंदर्यावर आणि फॅशनवर देखील फिदा आहेत.मात्र, गौतमी पाटीलच्या एका कार्यक्रमात पुन्हा एकदा काही तरुणांकडून कार्यक्रमात धुडगूस घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी आयोजकांना हा कार्यक्रम थांबविण्याची वेळ आली.

हा प्रकार खेड तालुक्यातील बहिरवाडी येथे घडला. दरम्यान धुडगूस घालणाऱ्या तरूणांना गावातील महिलांनी दांडक्यांने चांगलाच चोप दिला.

गौतमीच्या प्रत्येक गाण्यात तरुण धुडगूस घालत असल्याने कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आला. बहिरवाडी गावात यात्रा उत्सवानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

मात्र, गौतमीचे कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांकडून धुडगूस घालण्याचा प्रयत्न होतोय. तर काही भागात कार्यक्रमांवर बंदी, गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Join our WhatsApp group