कोल्हापूर : कोल्ड ड्रिंक्स घेऊन जाणारा कंटेनर उलटला, शीतपेयांच्या बाटल्यांसाठी लोकांची झुंबड

कोल्हापूर राधानगरी रोडवरील पिरवाडी (ता. करवीर) नजीकच्या वळणावर भोगावतीहून कोल्हापूरकडे शीतपेय घेऊन जाणारा ट्रक उलटून अपघात झाला.या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात रामलिंग सिंग (वय ३०) आणि गुरसिंग (वय २२) रा. इंदोर अशी जखमींची नावे असून हा अपघात शनिवारी पहाटे झाला आहे. या ट्रकमध्ये असणाऱ्या शीतपेयाच्या बाटल्यांचे भरलेले बॉक्स नेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी व वाहन चालकांची झुंबड उडालेली दिसली.

अधिक माहिती अशी की, गोव्याहून कोल्हापूरकडे शीतपेय घेऊन जाणारा ट्रक पिरवाडी (ता. करवीर) नजीक शनिवारी पहाटे तंदूर हॉटेलच्या वळणावर चेस तुटल्याने पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात ड्रायव्हर व क्लीनर हे दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या ट्रकमध्ये असणारे शीतपेयाचे बॉक्स रस्त्यावर पडले होते. ते नेण्यासाठी वाहनचालकांची, परिसरातील नागारिकांची अक्षरशः गर्दी झाली. या अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.

Join our WhatsApp group