Friday, April 19, 2024
Homeकोल्हापूरकळंब्यानजीक भरधाव एसटीने पादचाऱ्यांना उडवले, एकाचा जागीच मृत्यू

कळंब्यानजीक भरधाव एसटीने पादचाऱ्यांना उडवले, एकाचा जागीच मृत्यू

कोल्हापूर-गारगोटी राज्यमार्गावर कळंबा गावानजीक असणाऱ्या पेट्रोलपंपानजीक कोल्हापूरहुन मुरगुडला रात्री आठ च्या सुमारास निघालेल्या भरघाव वेगात धावणाऱ्या गारगोटी आगराच्या एसटीने ( एमएच ए क्यू ६३०६) रस्त्याकडेस चारचाकी( एमएच ०९ डीएम १९७३)लावून चालत रस्तापार करणाऱ्या दोन अज्ञात युवकांना उडवले.

या अपघातात एका अज्ञात युवकाचा अतिरक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला तर दुसरा अज्ञात युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला १०८ रुग्णवाहिकेतून सिपीआरला दाखल करण्यात आला असता त्याला नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. सिपीआर मधील मृत अज्ञात व्यक्तीची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -