Homeकोल्हापूरगोकुळच्या इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; म्हैस दूध विक्री दरात तब्बल 6...

गोकुळच्या इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; म्हैस दूध विक्री दरात तब्बल 6 रुपयांची वाढ

नुकतेच नवीन संचालक मंडळ आणि चेअरमन निवड झालेल्या गोकुळने दूध विक्री दरवाढीचा उच्चांक गाठत सामान्यांच्या खिशाला चांगलाच लोड दिला आहे. गोकुळ दूध संघाने म्हैस दूध विक्री दरात तब्बल ६ रूपयांची वाढ केली आहे.

 

तर म्हैशीच्या दूध खरेदी दरात ३ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. नवीन दूध दरवाढ ही शनिवारपासून लागू होणार आहे.

 

दुसरीकडे गाईच्या दूध खरेदी दरात २ रूपयांची वाढ करण्याचा निर्णय गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झाला आहे.तर गाईचे दूध खरेदी दर प्रती लिटर ४ वाढ झाली आहे. गोकुळला झालेली 70 कोटींची तूट भरून काढण्यासाठी केली दूध विक्री दरात मोठी वाढ करण्यात आलचं सांगण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात दुधाची उपलब्धता पाहून पुन्हा एकदा दर वाढवण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.

 

गोकुळच्या दरात शहरानुसार झालेली वाढ

 

कोल्हापूर – आधीचा म्हैंशीच्या दुधाचा दर ७२ रूपये लीटर होता. आता तो ७८ रूपये करण्यात आला आहे

 

कोकण – कोकणात म्हैंशीच्या दुधाचा दर ७६ रूपये लीटर होत. आता तो ८२ रूपये लीटर झाला आहे.

 

पुणे – पुण्यात म्हैंशीच्या दुधाचा दर ७८ रूपये लीटर होत. आता तो ८४ रूपये लीटर झाला आहे.

 

मुंबई- मुंबईत म्हैंशीच्या दुधाचा दर ७८ रूपये लीटर होत. आता तो ८४ रूपये लीटर झाला आहे.

 

काय म्हणाले चेअरमन?

 

याबाबत बोलताना गोकुळचे चेअरमन राजेश पाटील यांनी सांगितलं की, ‘आमच्या आधी आमचे स्पर्धक मदर डेअरी आणि अमुल यांनी दरवाढ घोषित केली होती. मात्र आम्ही आठ दिवस याबाबत चर्चा करून सर्व परिस्थितीचा आढावा घेत ही दूध दरवाढ घोषित केली. मधल्या काळात प्रशासक होता त्यावेळी झालेली तूट भरून काढण्याच्या दृष्टीकोणातून पावले टाकली जात आहेत.’

 

राजेश पाटील पुढे म्हणाले की, ‘आम्ही जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा आढवा घेणार आहोत. कारण राज्यात दुधाची उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यावेळी कशी परिस्थिती असेल ते पाहून आम्ही निर्णय घेणार आहोत.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -