ताजी बातमी / ऑनलाइन टीम
इचलकरंजी शहरातील पूरबाधित कुटूंबांच्या पंचनामा कामामध्ये दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज गुरुवारी इचलकरंजीत अप्पर तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी अप्पर तहसीलदार शरद पाटील हे निवेदन स्विकारण्यासाठी उपस्थित
नसल्याने संतप्त झालेल्या मोर्चेक-यांनी संबंधित
अधिका-यांना याच जाब विचारत चांगलेच धारेवर धरले.त्यामुळे कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यंदाच्या वर्षी पंचगंगा नदीच्या महापुरामुळे बरगे मळा ,जुना चंदूर रोड परिसरासह अन्य ठिकाणी घरांची पडझड होण्याबरोबरच प्रापंचिक साहित्याचे व शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे बहुतांश पूरबाधित नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.त्यामुळे शासनाने पूरबाधित परिसरातील घरांचे ,शेतीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्त पूरग्रस्तांना १० हजार रुपये आर्थिक सहाय्य व गहू ,तांदूळ ,राँकेल ,तूरडाळ अशी मदत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
असे असूनही केवळ पंचनामा कामात दिरंगाई झाल्याने इचलकरंजी शहरातील पूरबाधित बरगे मळा ,जुना चंदूर रोड परिसरासह अन्य ठिकाणच्या पूरबाधित कुटूंबांना १० हजाराचे आर्थिक सहाय्य यासह मोफत गहू ,तांदूळ ,राँकेल व तूरडाळ अशी कोणतीच मदत मिळालेली नाही.त्यामुळे शासकीय आर्थिक सहाय्य व अन्य मदतीपासून बहुतांश पूरग्रस्त वंचित राहिले आहेत.
याच अनुषंगाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज गुरुवारी इचलकरंजीत अप्पर तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी अप्पर तहसीलदार शरद पाटील हे निवेदन स्विकारण्यासाठी उपस्थित
नसल्याने संतप्त झालेल्या मोर्चेक-यांनी संबंधित अधिका-यांना याच जाब विचारत चांगलेच धारेवर धरले.
त्यामुळे कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.यावेळी काही पूरग्रस्त महिलांनी महापुराच्या नुकसानीमुळे आमचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे आम्हांला तात्काळ शासनाने मदत करावी ,असे साकडे देखील संबंधित
अधिका-यांना घातले.अखेर वरीष्ठ अधिका-यांनी मोर्चेक-यांची समजूत काढून त्यांच्या मागणीचे निवेदन स्विकारले.तसेच या मागण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्यासाठी वरीष्ठांकडे पाठपुरावा करु ,असे आश्वासन दिले..