ATMमधून फाटलेली नोट निघाली तर काय कराल?

बहुतेक लोक पैसे काढण्यासाठी ATM वापरतात. जेव्हा तातडीची गरज असेल तेव्हा लोक थेट बँकांऐवजी ATM मध्ये पोहोचतात. अशा परिस्थितीत काही वेळा असं घडतं की, एटीएममधून फाटलेल्या नोटा बाहेर येतात. अशावेळी या नोटेचं काय करायचं नेमकं कुठे द्यायची असा प्रश्न मनात येतो. मात्र घाबरू नका कारण फाटलेली नोट तुम्ही सहजरित्या बदलू शकता.

वास्तविक, ज्या बँकेच्या ATM मधून तुम्ही पैसे काढले आहेत त्याच बँकेत जाऊन तुम्ही हे करू शकता. एटीएममधून बाहेर काढलेली फाटलेली नोट बदलण्यासाठी कोणतीही बँक तुम्हाला कधीही नकार देणार नाही. एटीएममधून फाटलेली नोट मिळाली तर कोणतीही बँक ती तुम्हाला नकार का देऊ शकत नाही हे देखील जाणून घेऊया.

कशी बदलायची फाटलेली नोट?
ज्या एटीएममधून फाटलेली नोट मिळाली आहे, त्याच एटीएमच्या बँकेत जाऊन भेट देऊन ग्राहक अर्ज सादर करू शकतात. अर्जामध्ये ग्राहकांना पैसे काढण्याची तारीख, वेळ आणि एटीएमचे ठिकाण शेअर करावं लागेल. तसंच, पैसे काढताना ग्राहकांना एटीएममधून जी स्लिप मिळाली, ती जोडावी लागेल.

जर तुमच्याकडून स्लिप हरवली असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आलेल्या मेसेजचा तपशील द्यावा लागेल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आरबीआयने जारी केलं होतं की, सरकारी नोटा बदलण्यासाठी तुम्हाला कोणीही नकार देऊ शकत नाही.
फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी कारवाई करता येत नाही.

अहवालानुसार, ‘जर तुमची नोट फाटलेली आढळली आणि बँकेने ती बदलण्यास नकार दिला तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. जर बँकेने दिलेल्या नियमांचं पालन केलं नाही तर बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकतं.

Leave a Reply

Join our WhatsApp group