बालसुधारगृहातील मुलाची आत्महत्या….


साताऱ्यात बालसुधारगृहातील मुलाने आज (शनिवार) सकाळी आत्महत्या केल्याचे समोर आले. बालसुधारगृहातील मुलाची आत्महत्या झाल्याच्या घटनेनंतर परिसरात व सिव्हिल बाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, साताऱ्यात बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलाने बाथरूममध्ये आत्महत्या केल्याचे समोर आले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. महसूल व पोलिस विभागाला माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संबधित संशयितांवर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.


बालसुधारगृहातील या घटनेनंतर परिसरात व सिव्हिल बाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group