Friday, June 2, 2023
Homenewsवर्जिनिटी पुन्हा मिळवण्यासाठी मुली करतायत 'या' पद्धतीचा वापर

वर्जिनिटी पुन्हा मिळवण्यासाठी मुली करतायत ‘या’ पद्धतीचा वापर


वर्जिनिटी टेस्टचा सध्या पुन्हा गाजतोय. यावेळी ब्रिटिश डॉक्टरांनी त्याविरोधात मोर्चा काढला आहे. इथल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की, जोपर्यंत ‘वर्जिनिटी रिपेयर’च्या नावाखाली बनावट ऑपरेशन बंद होत नाहीत, तोपर्यंत कौमार्य चाचणीवर कायदा करून काही उपयोग नाही.


रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनेकोलॉजिस्टने सरकारला इशारा दिला आहे आणि वर्जिनिटी रिपेयर शस्त्रक्रियेवर कठोर बंदी घालण्याची मागणी केली आहे. गेल्या महिन्यात संसद सदस्यांच्या समितीने काही खासगी दवाखान्यांद्वारे घेतलेल्या वर्जिनिटी रिपेयरला गुन्हेगारीच्या श्रेणीखाली आणण्याची मागणी करणारा ठराव मांडला होता.


डॉक्टरांचं म्हणणं आहे की, एकीकडे सरकार वर्जिनिटी टेस्टवर कायदा बनवण्याचा दावा करतंय. तर दुसरीकडे ‘वर्जिनिटी रिस्टोर’ करण्याच्या प्रक्रियेवर कोणतंही बंधन नाही लावत. वर्जिनिटी रिपेयर शस्त्रक्रियेत, वजायनाच्या स्किनचा एक थर दुरुस्त केला जातो जेणेकरून हायमेन तुटलेलं दिसत नाही. या शस्त्रक्रियेला हायमेनोप्लास्टी म्हणतात.


यूकेमध्ये, बहुतेक मुली आणि स्त्रियांना वर्जिन असल्याचं दाखवण्यासाठी त्यांच्या पालकांनी किंवा नातेवाईकांकडून हायमेनोप्लास्टी केली जाते. 2020 मध्ये, संडे टाइम्सने तपासणीनंतर असे 22 खाजगी दवाखाने उघडीस आणले जे वर्जिनिटी रिपेयर शस्त्रक्रियेच्या नावाखाली भरमसाठ पैसे आकारतात. एका वर्षाच्या आत, येथे सुमारे 9,000 लोकांनी गुगलवर हायमेनोप्लास्टी आणि त्याच्याशी संबंधित माहिती शोधली.


रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनेकोलॉजिस्ट म्हणतात की, जर वर्जिनिटी रिपेयरची प्रक्रिया थांबवली नाही तर, वर्जिनीटी टेस्ट थांबवण्याचे प्रयत्न व्यर्थ जातील.


आरसीओजीचे अध्यक्ष डॉ एडवर्ड मॉरिस यांनी द गार्डियनला सांगितलं, “आमचं मत आहे की, यूकेमध्ये दोन्ही प्रक्रियांवर बंदी घातली पाहिजे. हायमेनोप्लास्टी आणि वर्जिनीटी टेस्ट या दोन्ही हानिकारक पद्धती आहेत. ज्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय मूल्यांना डागाळण्याचं काम करतात. ते महिलांच्या आधीच्या लैंगिक संबंधांबद्दल चुकीची माहिती देतात. हायमेनोप्लास्टीवर बंदी घातल्याशिवाय वर्जिनीटी टेस्टिंगवर बंदी घालण्याचा फायदा नाही. कारण दोन्ही पद्धती एकमेकांशी जोडलेल्या आहेत

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group