Xiaomi Mi Band 6 लॉंच; जाणून घ्या किंमत, भन्नाट फीचर्स


शाओमीनेचे अनेक प्रोडक्ट ग्राहकांच्या पसंतीस उतरतात. स्मार्टफोनपासून ते स्मार्टवॉचपर्यंत अनेक प्रोडक्ट ग्राहकांना भुरळ घालत असतात. नुकतेच शाओमीने आपली स्मार्टवॉच Mi Band 6 लॉंच केले आहे. सोबतच त्याच्या फीचर्स आणि किंमतीवर देखील प्रकाश टाकला आहे.


कितीला मिळणार Mi Band 6
शाओमीने एका कार्यक्रमात Mi Band 6 ची किंमत घोषित केली आहे. कंपनीचा सर्वात महागडा फिटनेस ट्रॅकर Mi Band 6 मार्केटमध्ये 3499 रुपयांना उपलब्ध असणार आहे. हा बॅंड 5 पेक्षा 1 हजार रुपयांनी महाग असणार आहे. परंतु तुम्ही ऑफरमध्ये हा बॅंड 2999 रुपयांत खरेदी करू शकता. या बँडसंदर्भातील अपग्रेडची माहिती 30 ऑगस्टरोजी Mi App वर जारी केली जाणार आहे.


• डिस्प्ले : 152×486 पिक्सेल 1.56 इंच एमोलेड
• पिक्सेल डेन्सिटी : 326 पीपीआय आणि 450 nits ची पीक ब्राइटनेस
• 24 तास हर्टरेट मॉनिटर करणार.
• आरईेएम फीचर आपली स्लीप ट्रॅकिंग करणार आणि सोबतच झोपताना तुमच्या स्लीप-ब्रीदिंग क्वॉलिटीकडे लक्ष देईल.
• 30 एक्सर्साइज मोड, 6 वर्कआऊटमोड्चे ऑटो-डिटेक्शन, रक्तातील ऑक्सिजन लेवल तपासण्याची क्षमता, वॉटर रेजिस्टंन्स आणि एका दमात चार्ज करून 14 दिवस चालणारी बॅटरी इत्यादी
कनेक्टिविटीमध्ये Mi Wear, Mi Fit आणि स्ट्रावा एप्सला सपोर्ट करते. ब्लुटूथ 5.0 ची सुविधा देते आणि ऍंन्ड्रॉइड 5.0 आणि iOS 10 आणि त्यानंतरच्या वर्जनवर चालणारे डिवाइसेसला कम्पॅटिबल आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group