विद्यार्थिनी व खेळाडूंनी ध्येय निश्‍चित करावे शेखर शहा


ताजी बातमी/ऑनलाइन टीम
इचलकरंजी/प्रतिनिधी –
पारतंत्र्याच्या गुलामगिरीत असतानादेखील आंतरराष्ट्रीय पातळीवर हॉकीच्या माध्यमातून मेजर ध्यानचंद यांनी भारत देशाचे नांव उज्वल केले. फुटबॉलमध्ये पेले, क्रिकेटमध्ये ब्रॅडमन यांना जे स्थान आहे तेच स्थान ध्यानचंद यांना आहे. सर्व भारतीय खेळाडूंना ते प्रेरणादायी आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थीनी व खेळाडूंनी ध्येय निश्‍चित करुन वाटचाल करावी, असे आवाहन प्रा. शेखर शहा यांनी केले.


येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडादिना निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. शहा बोलत होते. यावेळी विद्यार्थिनींनी नेहमी नियमित व्यायाम, सकस आहार घेवून शरीर तंदुरुस्त ठेवावे, असे सांगत मेजर ध्यानचंद यांचा जीवनपट सविस्तरपणे उलगडला.


अध्यक्षस्थानावरुन बोलताना मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर यांनी, विद्यार्थिनींनी नेहमी आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच खेळाच्या सरावात सातत्य ठेवावे असे आवाहन केले. तसेच मेजर ध्यानचंद यांच्या नावाने भारत सरकारने खेलरत्न पुरस्कार जाहीर केल्याचा उल्लेख करत हा मेजर ध्यानचंद यांचा गौरवच असल्याचे सांगितले.


प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिक श्रीमती गोंदरकर यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा विभागातर्फे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास उपप्राचार्य आर. एस. पाटील, पर्यवेक्षिका सौ. एस. एस. भस्मे, पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे, सौ. एस. के. पाटील, एस. एन. पवार यांचेसह हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Join our WhatsApp group