हलोंडी व इंगळीतील पूरग्रस्तांना जीवनावश्यक किटचे वाटप

ताजी बातमी/ऑनलाइन टीम
इचलकरंजी/प्रतिनिधी –
आचार्यश्री आनंद युवा मंचच्या माध्यमातून श्री रविवार पेठ वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ सादडी सदन पुणे आणि श्री संघच्या वतीने जीवनभाऊ पुनमिया यांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या मातंग चेतना परिषद यांच्या पुढाकाराने हातकणंगले तालुक्यातील हालोंडी व इंगळी येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट देण्यात आले. जवळपास 120 किट प्रदान करण्यात आले.


मागील दोन वर्षापासून उद्भवलेला कोरोना आणि महापूराच्या संकटामुळे व्यापारी वर्गसुद्धा अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीतसुध्दा सामाजिक बांधिलकी जपत व्यापारी वर्गाने मदतीचा हात दिल्याबद्दल मातंग चेतना परिषद यांच्यावतीने आभार मानण्यात आले. प्रितम बोरा यांनी, आचार्यश्री आनंद युवा मंचच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी समाजकार्यात सदैव अग्रेसर असणार्‍या श्री वर्धमान श्‍वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघचे उपाध्यक्ष जीवनराज पुनमिया यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या मातंग चेतना परिषदेला 11 हजार रुपयांची मदत जाहीर केली.
याप्रसंगी ट्रस्टी राजेंद्रजी बंब, माजी नगरसेवक दिलीप मुथा, मनोज चंगेडीया, अतुल गांधी, जवाहर चोपडा, आचार्यश्री आनंद युवा मंचचे राजेंद्र बोरा, दिनेश चोपडा, सुमित मुनोत, नुतन मुथा, जितेंद्र जैन, पंकज बाबेल, संघचे शांताराम सोळवंडे, शिंदे यांच्यासह सरपंच व सदस्य उपस्थित होते.


विशेष म्हणजे यावेळी ग्रामस्थांनी सर्वांना राख्या बांधुन रक्षाबंधनसारख्या पवित्र सणाचे महत्व दाखवून दिले. दिलेल्या सहकार्याबद्दल ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले. याकामी मंचला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तालुका कार्यवाहक सनथ दायमा यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Join our WhatsApp group