Thursday, April 25, 2024
Homeतंत्रज्ञानAadhaar Card ‘मध्ये ऑनलाइन सुधारणा करण्यासाठी लागतात ‘ही’ 32 कागदपत्रे

Aadhaar Card ‘मध्ये ऑनलाइन सुधारणा करण्यासाठी लागतात ‘ही’ 32 कागदपत्रे

ताजी बातमी ऑनलाइन टीम

आधार कार्डचा वापर भारतात अत्यावश्यक कागदपत्र म्हणून केला जात आहे आधारचा वापर बँकांपासून प्रत्येक महत्त्वाच्या कामात होऊ लागला आहे, सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड आवश्यक आहे.

त्यामुळेच आधार कार्ड (Aadhaar Card) योग्य तपशीलांसह सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. मात्र, तुमच्या आधार कार्डमध्ये काही चुका असतील तर तुम्ही त्या दुरुस्त करू शकता. यासाठी तुम्ही ऑनलाइन सुविधा वापरू शकता.

घरबसल्या आरामात आधार कार्डमधील नाव, जन्मतारीख आणि पत्ता बदलू शकता. दुसरीकडे, जर तुम्हाला हे काम घरबसल्या करायचे नसेल किंवा तुम्हाला ते शक्य नसेल, तर तुम्ही UIDAI द्वारे देशात उघडलेल्या CSC केंद्रांना भेट देऊन सुधारणा करू शकता. ऑनलाइन किंवा ऑफलाइन दुरुस्तीसाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता आहे.


या कागदपत्रांचा वापर करून तुम्ही तुमच्या आधार कार्डमधील नवीन डेटा सहज अपडेट करू शकता. तुम्ही 32 प्रकारांपैकी काही कागदपत्रांचा वापर करून दुरुस्त्या करू शकता. ही कागदपत्रे पुढील प्रमाणे…

1. मतदार ओळखपत्र

2. पासपोर्ट

3. रेशनकार्ड

4. पॅन कार्ड

5. ड्रायव्हिंग लायसन्स (DL)

6. PSU सरकारी फोटो ओळखपत्र / सेवा फोटो ओळखपत्र

7. नरेगा जॉब कार्ड

8. शैक्षणिक फोटो ओळखपत्र

9. शस्त्र परवाना

10. फोटो क्रेडिट कार्ड

11. बँक फोटो एडीएम कार्ड

12. पेन्शनधारकांसाठी बनवलेले कार्ड

13. शेतकरी फोटो पासबुक

14. स्वातंत्र्य सैनिक फोटो कार्ड

15. CGHS / ECHS फोटो कार्ड

16. पोस्ट विभागाने जारी केलेले नाव आणि छायाचित्र असलेले पत्त्याचे कार्ड
17. राजपत्रित अधिकारी किंवा तहसीलदार यांनी जारी केलेले फोटो असलेले ओळख प्रमाणपत्र

18. अपंगत्व ओळखपत्र / अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र

19. राजस्थानसाठी सरकारने भामाशाह कार्ड/जन-आधार कार्ड जारी केले.

20. अधिक्षक / वॉर्डन / मॅट्रॉन / मान्यताप्राप्त निवारागृहे किंवा अनाथाश्रम इत्यादी संस्थेचे प्रमुख यांचेकडून प्रमाणपत्रे.

21. खासदार किंवा आमदार किंवा एमएलसी किंवा नगरपालिकेने जारी केलेले फोटो असलेले ओळख प्रमाणपत्र

22. UIDAI मानकानुसार ग्रामपंचायत प्रमुख किंवा सरपंच किंवा त्याच्या समतुल्य प्राधिकरणाने जारी केलेला फोटो ओळखपत्र पुरावा (ग्रामीण भागांसाठी)

23. नाव बदलासाठी राजपत्र अधिसूचना

24. फोटोसह विवाह प्रमाणपत्र

25. आरएसबी कार्ड
26. उमेदवारांचे छायाचित्र असलेले SSLC पुस्तक.

27. फोटोसह ST/SC/OBC प्रमाणपत्र

28. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (SLC) / शाळा स्थानांतर प्रमाणपत्र (TC), नाव आणि छायाचित्र असलेले.

29. शाळेच्या मुख्याध्यापकांनी नाव आणि फोटोसह जारी केलेले पत्र.

30. नाव आणि फोटोसह बँक पास बुक

31. मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेने जारी केलेले नाव आणि छायाचित्र असलेले ओळख प्रमाणपत्र.

32. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नाव, फोटो आणि पत्त्याचे जारी केलेले ओळखपत्र.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -