Thursday, March 28, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी ; महाविकास आघाडीविरोधात भाजपाची निदर्शने

इचलकरंजी ; महाविकास आघाडीविरोधात भाजपाची निदर्शने

ताजी बातमी ऑनलाईन टीम

इचलकरंजी ; तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार पुरस्कृत महाविकास आघाडी सरकारने विविध विभागात कंत्राटी नोकर भरतीचा अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाच्या विरोधात भारतीय जनता पार्टी इचलकरंजीच्या
वतीने शहराध्यक्ष पै. अमृत भोसले यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा जाहीर निषेध करत निदर्शने करण्यात आली.

कंत्राटी नोकर भरती हे मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाप असून आपण स्वतः केलेल्या पापाचा घडा दुसऱ्याच्या माथी फोडायचे आणि आपणच याचा विरोध करण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे. कंत्राटी नोकर भरतीचा अध्यादेश काढला होता. कंत्राटी भरतीवरून
युवकांच्या मनात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करून घाणेरडे राजकारण महाविकास आघाडी करत असल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. .

यावेळी विनोद कांकाणी, प्रसाद खोबरे, प्रशांत शालगर, राजेंद्र पाटील, प्रवीण पाटील, अरुण कुंभार, उत्तम चव्हाण, अनिस म्हालदार, जयकुमार काडाप्पा, ॲड. भरत जोशी, बाळकृष्ण तोतला, मोहन बनसोडे, मोहन कुंभार, हेमंत वरुटे, विजयसिंह राठोड, अशोक पुरोहित, प्रदीप कांबळे, संजय नागुरे, प्रदीप मळगे, सलिम शिकलगार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -