Thursday, April 18, 2024
Homeक्रीडाविश्वचषकात भारताचा पाचवा सामना न्यूझीलंड विरुध्द..सर्वांचे लक्ष या हाय होल्टेज सामन्यांकडे

विश्वचषकात भारताचा पाचवा सामना न्यूझीलंड विरुध्द..सर्वांचे लक्ष या हाय होल्टेज सामन्यांकडे

विश्वचषकमध्ये सलग चार सामने जिंकल्यानंतर भारताचा पाचवा सामना न्यूझीलंड विरुध्द असून या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतासारखेच न्यूझीलंडने सुद्दा सलग चार सामने जिंकले आहे.

पण, गुणतालिकेत हा संघ अव्वल आहे. त्यामुळे या सामन्यात भारताने विजय मिळवला तर भारतीय संघ अवल्लस्थानी असणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

२०१९ मध्ये न्यूझीलंड भारत सामन्यातही अशीच पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे साखळीतील हा सामना रद्द झाला होता. त्यानंतर हा सामना राखीव दिवशी झाला व भारतीय संघ १८ धावांनी पराभूत झाला होता. आज धरमशाला येथे होणा-या या सामन्यापूर्वी शनिवारी सराव करतांना इशान किशन याला मधमाशीने दंश केल्यामुळे तर सूर्यकुमार यादव सराव करताना त्याच्या उजव्या हाताला चेंडू लागल्यामुळे त्यांनी सराव केला नाही.

याअगोदर बांगलादेशच्या सामन्यात हार्दिक पंडया हा जखमी झाला आहे. त्यामुळे भारतीय संघाला धक्का लागला आहे. या सामन्यात आर अश्विनला संधी मिळू शकते. आता कोणते ११ खेळाडू या महत्त्वाच्या सामन्यात उतरता हे महत्त्वाचे आहे. भारतीय संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. त्यामुळे रोहित शर्मा काय व्यूहरचना आखणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

विश्वचषकासाठी भारत यजमान आहे. त्यामुळे भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान या चषकाचे सामने होणार आहे. पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला होता. त्यात न्यूझीलंडने विजय मिळवला होता. तर भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया बरोबर झाला. त्यात भारताने विजय मिळवला. या विजयानंतर दोन्ही संघाने तीन सामने सलग जिंकेले आहे. त्यामुळे या विश्वचषकाच्या या सामन्यात हे दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळे हा सामना हायहोल्टेज असणार आहे.

धरमशाला येथे हा सामना दुपारी २ वाजता सुरु होईल. तर १ वाजून ३० मिनिटांनी टॉस होणार आहे. भारताची टीममध्ये रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव हे खेळाडू आहे. यात कोणाल संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -