इचलकरंजी : नगरसेवक मनोज साळुंखे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शासकीय विविध सुविधा उपलब्ध

ताजी बातमी/ऑनलाइन टीम इचलकरंजी/प्रतिनिधी –
केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने सर्वसामान्य गोरगरीबांसाठी तसेच विविध कामांसाठी राबविण्यात येत असलेल्या शासकीय योजनांचा लाभा तळागाळापर्यंत पोहचावा यासाठी प्रभाग 12 मधील नगरसेवक तथा शिक्षण सभापती मनोज साळुुंखे यांनी जनसंपर्क कार्यालयात सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.


नगरसेवक मनोज साळुंखे युवाशक्तीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे श्री. साळुंखे यांनी सांगितले. या माध्यमातून इचलकरंजी शहरातील पहिले ई श्रम कार्ड करण्यासह 72 जणांना कार्डचे वितरण केले. त्यासाठी आवश्यक आधार लिंकची गरज ओळखून सुविधा उपलब्ध केली आहे.

त्याचबरोबर आयुष्यमान भारत योजनेमध्ये आतापर्यंत 73 लाभार्थ्यांना कार्डचे वितरण केले आहे. आयुष्यमान भारत योजनेमध्ये 1350 आजारावर देशातील 21 हजार रुग्णालयात उपचार होणार असल्यामुळे कोरोनाच्या महामारीच्या संकटकाळात लोकांना आधार देण्याचे काम होणार आहे, असे साळुंखे यांनी सांगितले.


या शिबिराचे नियोजन सुनिल कांबळे, संजय धुमाळ, प्रमोद इंगवले यांनी केले. तर युवाशक्तीचे धनंजय दाहोत्रे, अनिकेत सुतार, महादेव सातपुते आदींनी परिश्रम घेतले. दोन दिवस हे शिबीर मनोज साळुंखे यांच्या जनसंपर्क कार्यालयात चालू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group