इचलकरंजी : व्हिजन इचलकरंजीतर्फे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन

ताजी बातमी/ऑनलाइन टीम इचलकरंजी : व्हिजन इचलकरंजीतर्फे अभ्यासपूर्वक वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन केले जात आहे. हे कार्य कौतुकास्पद असून त्यांचे पर्यावरणबाबतचे कार्य म्हणजे शहराला दिलेला व्हिजन आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी येथे केले. येथील शिवाजीराव खवरे भाजी मार्केटमधील व्हिजन इचलकरंजीच्या महावृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. 

    शहराच्या मध्यवर्ती असलेल्या शिवाजीराव खवरे भाजी मार्केटमध्ये १०-१२ फुटांचे ३५० वृक्षारोपण करण्याचा व्हिजन इचलकरंजीने उपक्रम हाती घेतला आहे. रविवारी पहिल्या टप्प्यात येथे ७० वृक्षारोपण केले जाणार आहे. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी महावृक्षारोपण कार्यक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

   सौ. स्वामी म्हणाल्या, महापूर, कोविड किंवा विविध सामाजिक कार्यात व्हिजनने दिलेले योगदान मोठे आहे. लोकसहभागातून कार्यक्रम कसा घ्यावा, याचे उत्कृष्ट उदाहरण त्यांनी दाखवून दिले आहे. तसेच मार्केटमध्ये येणाऱ्या भाजी विक्रेते व नागरिकांसाठी पिण्याची व झाडांसाठीही पाण्याची सोय पालिकेतर्फे करून देऊ. येथे शिपाई नेमून झाडांच्या संवर्धनासाठी मदत केले जाईल. व्हिजनच्या सर्व उपक्रमात पालिकेचे सहकार्य मिळेल. 

   मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, व्हिजनचे कार्य वाखाणण्यासारखे आहे. झाडांच्या संवर्धनासाठी व्हिजनच्या प्रयत्नाबरोबर आम्हीही सोबत असणार आहोत.

    यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी, व्हिजनकडून नेहमीच चांगले उपक्रम होत असतात. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मदत करू,असा विश्वास व्यक्त करत येथे ट्री गार्ड व पाण्याची गरज असल्याने बोअर मारावी, अशी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी केली.

  याप्रसंगी नगरसेवक सुनिल पाटील, मंगेश कांबुरे, नगरसेविका किरण खवरे, मिश्रिलाल जाजू, इम्रान मकानदार, सुबोध भिंगार्डे, पवन टीबडेवाल, शिवजी व्यास, उल्हास अतितकर, विजय कुडचे आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.

   स्वागत विजय पाटील, प्रास्ताविक अशोक पाटणी यांनी केले. तर गोपाळ खंडेलवाल यांनी कार्यक्रमाची माहिती विशद केली. सूत्रसंचालन प्रा. युवराज मोहिते यांनी केले. आभार इराण्णा सिंहासने यांनी मानले.

   कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेश व्यास, स्वप्निल मद्यापगोळ, राहुल पारीख, अमित कुंभार, रोहित बावधनकर, निकुंज टीबडेवाल, सचिन सावंत, महावीर भन्साळी, उत्तम सुतार, संकेत गजबी, प्रमोद सपाटे, विशाल माळी, सचिन कांबळे, शिवाजी गोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Join our WhatsApp group