गणेशोत्सव पार्श्वभुमीवर कोल्हापूर शहरातील ९० गुन्हेगार १० दिवसांसाठी हद्दपार


गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस दप्तरी गंभीर कारनाम्यांचे रेकॉर्ड असलेल्या तब्बल ९० गुन्हेगारांना एकाचवेळी दहा दिवसासाठी शहरासह करवीर तालुक्यातून हद्दपार करण्यात आल्याने गुन्हेगाारी वर्तळात खळबळ उडाली आहे.

त्यात राजारामपुरीतील ४०, लक्ष्मीपुरी १४, राजवाडा १७, शाहूपुरीतील १९ सराईतांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या प्रस्तावाला प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी शुक्रवारी मंजुरी दिली. शहरातील आणखी ४८ सराईत ‘ रडार’ वर आहेत. दोन दिवसात कारवाई शक्य असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Join our WhatsApp group