Wednesday, April 17, 2024
Homenewsवीस रुपयांसाठी पंचवटीत मजुराचा खून

वीस रुपयांसाठी पंचवटीत मजुराचा खून


पंचवटीतील राम रतनलॉज येथील बंद गाळ्यासामोर शुक्रवारी (दि.१०) रात्री एका ३० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली होती.
या प्रकरणी संशयित पंडित उर्फ पंड्या रघुनाथ गायकवाड (२१, रा. त्र्यंबकेश्वर, नाशिक) यास पंचवटी खुनी शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. यातील मयत व्यक्ती फिरस्ती मजूर असून, हा खून अवघ्या वीस रुपयांसाठी केल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मयत व्यक्ती ही सुनील नामक फिरस्ती मजूर होती. पंचवटी परिसरात मिळेल ते काम करून पोट भरत होता. रस्त्यालगत मिळेल त्या ठिकाणी तो वास्तव्य करीत होता.

अवघ्या वीस रुपयांसाठी पंचवटीत मजुराचा खून
शुक्रवारी (दि.११) रात्रीच्या सुमारास सुनील हा जुना आडगाव नाक्यावरील रामरतन लॉज येथे दोन मजूर मित्रांसोबत गप्पा मारत असताना संशयित पंडीत गायकवाड तेथे आला. त्याने सुनीलकडे २० रुपयांची मागणी केली.


सुनीलने त्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. यात संशयित पंडित याने थेट ब्लेडच्या कटरने सुनीलच्या गळ्यावर वार केला. यानंतर संशयित पंडित तेथून पसार झाला.


जखमी सुनील जीव वाचविण्यासाठी जुना आडगाव नाका ते वाघाडी आणि पुढे सेवाकुंजपर्यंत पळत गेला. रक्तस्राव जास्त झाल्याने अखेर तो बेशुद्धावस्थेत रस्त्यालगत कोसळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा सुनील रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.


पोलिसांनी सदर युवकास उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी सुनील यास तपासून मयत घोषित केले.
दरम्यान, रात्री पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलिस आयुक्त मधुकर गावित, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे व गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -