कोल्हापुरातील प्रसिद्ध अर्जुन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा संतोष शिंदे यांनी आपला मुलगा आणि पत्नीसह आत्महत्या केली होती. शिंदे यांच्याजवळ आढळलेल्या सुसाइड नोटमध्ये उल्लेख असलेल्या माजी नगरसेविका आणि पोलीस अधिकाऱ्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं असून कोल्हापूर पोलिसांच्या टीमने दोघांना कर्नाटकातील विजापूरमधून ताब्यात घेतलं आहे. तर अन्य दोघांचा ताब्यात घेण्यासाठी पोलीस पुणे परिसरात गस्त घालत आहे.
गडहिंग्लज येथील उद्योजक संतोष शिंदे यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून त्यांच्याकडून खंडणी मागितल्याने आणि सतत देत असलेल्या त्रासातून मुक्त होण्यासाठी त्यांनी शनिवारी पत्नी व मुलाला संपवून शिंदे यांनी स्वतःचं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली. यावेळी संतोष शिंदे यांनी कुटुंबासह आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. ज्यात त्यांनी एका महिलेने माझ्याविरोधात बलात्काराची खोटी तक्रार दिल्याचं म्हटलं होतं. तिचे व तिच्या साथीदाराचे नाव या चिठ्ठीत लिहून त्यांच्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे शिंदे यांनी सुसाइड नोटमध्ये नमूद केलं होतं.
संतोष शिंदेंनी आत्महत्या केल्याचं कळताच सदर माजी नगरसेविका आणि तिचा साथीदार पोलीस अधिकारी राहुल राऊत यांनी गडहिंग्लज येथून पलायन केले होते. पोलिसांनी याप्रकरणी माजी नगरसेविका, पोलिस अधिकारी राहुल राऊत, विशाल बाणेकर, संकेत पाटे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून शोध मोहीम सुरू केली होती. रविवारी दिवसभर पोलिसांची दोन पथके या आरोपींच्या मार्गावर होती. यातील माजी नगरसेविकेसह पोलीस अधिकारी राहुल राऊत याला पोलिसांनी कर्नाटकातील विजापूर येथून ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून अन्य दोघांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचं पथक पुणे परिसरत फिरत आहे.
दरम्यान, शवविच्छेदन अहवालावरून पत्नी व मुलगा यांचा विष पाजून, गळा चिरून खून आणि त्यानंतर स्वतः विष प्राशन करत आत्महत्या केल्याप्रकरणी मृत शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक गजानन सरगर करत आहेत. शनिवारी रात्री उशिरा तीनही मृतदेहांवर नदीवेस येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तर बलात्काराचा खोटा गुन्हा आणि खंडणीची मागणी करून शिंदे, त्यांची पत्नी व मुलास आत्महत्येला प्रवृत्त करुन, माणुसकीला काळिमा फासलेल्या आरोपींचे वकीलपत्र कुणीही घेऊ नये, असे आवाहन येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे गडहिंग्लज ॲडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष सतीश तेली यांना केले आहे.
कोल्हापुरातील उद्योगपतीच्या उद्ध्वस्त कुटुंबाला न्याय देण्यात पोलिसांना यश
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -






