Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रपब्जीच्या नादात तलवारीने केला खराखुरा हल्ला; 22 वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू

पब्जीच्या नादात तलवारीने केला खराखुरा हल्ला; 22 वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू

ठाण्याच्या वर्तकनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पब्जी खेळात वारंवार जिकंण्यावरून झालेल्या वादातून एका 22 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये मृत तरुणावर दोन अल्पवयीन तरुणांनी चाकू, सुरे, तलवारीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे.

साहिल बबन जाधव असे या मृत तरुणाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी म्हणजेच सोमवारी रात्री मुख्य आरोपीसह अन्य तिघांनी साहिलवर हल्ला केला होता. मृत साहिल जाधव हा पब्जी खेळात हुशार होता. तिन्ही आरोपी हे संगनमत करीत पब्जी खेळात मृत साहिल जाधव याला नेहमी किल करीत होते. यावरून 2019 मध्ये साहिल आणि अटक झालेल्या तिन्ही आरोपींमध्ये वाद झाला होता. या वादातून किरकोळ हाणामारीसुद्धा झाली होती. यानंतर साहिलने वर्तकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दाखल केली होती.

याच गोष्टीचा राग आरोपींना आला. यानंतर आरोपी प्रणव प्रभाकर माळी, राहुल महादेव गायकवाड आणि गौरव रवींद्र मिसाळ यांनी एकत्र येऊन साहिल जाधव याला किल करायचे असे ठरवले मात्र पब्जी खेळात नाहीतर प्रत्यक्षात किल करण्याचे ठरविले. यानंतर त्यांनी चाकू, सुरा आणि तलवारीच्या सहायाने साहिल याला जानकीदेवी चाळ, जुनी पाईपलाईन जवळ गाठून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये साहिलचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी एका मुख्य आरोपी प्रणव यांच्यासह दोन अल्पवयीन आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला. यानंतर या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 6 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वर्तकनगर पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -