ताजी बातमी ऑनलाईन टीम
प्रेयसीला प्रियकराने एमआयडीसीतील जंगल परिसरात नेले. तुझं दुसऱ्या मुलाशी अफेअर आहे. असे म्हणून तिच्या डोक्यावर दगडाचे घाव घालून तिला जीवानिशी ठार केले. तसेच प्रियकराने त्याच परिसरातील रस्त्यावर स्वतःच्या गळ्यावर शस्त्राने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जखमी प्रियकरला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. गंभीर तरुणावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुभम असं जखमी तरुणाचे नाव आहे.
शुभमचे एका मुलीवर प्रेम होते. पण, दुसऱ्याशी बोलणे त्याला खटकत होते. तुझं माझ्याव्यतिरिक्त दुसऱ्या मुलाशी अफेअर आहे. असं तो तिला म्हणायचा. पण, तसं काही नाही म्हणून ती विषय थांबवायची. पण, गुरुवारी शुभमच्या मनात काहीतरी वेगळेच होते. त्याने सकाळी दहाच्या सुमारास तिला जंगलात एकांतात नेले. आपण फिरायला जाऊ असं तो म्हणाला. तिही नेहमीप्रमाणे त्याच्यासोबत गेली. पण, शुभमच्या डोक्यात काहीतरी वेगळंच शिजत होतं. तू माझ्याव्यतिरिक्त दुसऱ्या युवकाशी का बोलते. तुझं त्याच्याशीही अफेअर आहे. अशी शंका उपस्थित केली. तिने नेहमीप्रमाणे विरोध केला. पण, वाद वाढतच गेला.
शुभमने तिला संपविण्याचा प्लान केला होता. त्यामुळं त्याने सोबत चाकू घेतला होता. त्या चाकूने तिच्या शरीरावर सपासप वार केले. एवढ्यावरच त्याचे समाधान झाले नाही. तर बाजूला असलेले दगड त्याने उचलले. तेही तिच्या शरीरावर आपटले. क्रूरपणे तिला ठेचून मारले. यात ती जागीच ठार झाली. त्यानंतर त्यानेही स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला. पण, यात तो बचावला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत