ताजी बातमी ऑनलाईन टीम
अभिनेत्री मालायका अरोरा बोल्ड आणि बिनधास्त… पण नेटकरी मात्र तिला ट्रोल करत असतात. पण ती याकडे दुर्लक्ष करून ती या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असते. पण आता पहिल्यांदाच तिने ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. तिच्या उत्तराने ट्रोलर्स दोनदा विचार करूनच ट्रोलर्स तिला ट्रोल करण्याचं धाडस करती. तिची स्टाईल, तिचा घटस्फोट, तिचं अफेअर, तिचं ब्रेकअप मलायकाच्या सगळ्याच गोष्टी चर्चेत असतात. मलायका काय करते काय नाही यावर नेटकऱ्यांची बारिक नजर असते.बऱ्याचहा तिला ट्रोलही केलं जातं. अर्जुन कपूर आणि मलायका रिलेशनशीपमध्ये आहेत. या दोघांच्या वयातील अंतरामुळे त्यांच्यावर टीका होते. एका नेटकऱ्याने तिला ‘तू तर उतावळी नवरी आणि गुडघ्याला बाशिंग’ असं म्हटलं होतं. त्यावरच मलायका बोलती झाली आहे.
मलायका नेहमी ट्रोल होत असते. अनुल्लेखाने ट्रोलर्सना मारण्याचा ती प्रयत्न करते. पण पहिल्यांदाच ट्रोलरला मलायकाने उत्तर दिलं आहे. मलायका म्हणाली की, “आपल्या समाजात मुलगा वयाने मोठा असेल आणि मुलगी लहान असेल तर चालतं. पण मुलगी वयाने मोठी असेल आणि मुलगा लहान असेल तर लोकांच्या डोळ्यात खुपतं. अश्या कमकुवत मनाच्या लोकांना मी गणतीत धरत नाही. अश्या लोकांकडे मी साफ दुर्लक्ष करते. त्यांच्या कमेंट्स मी वाचतही नाही. कारण त्यांचा विचार केला तर आपण जगू शकत नाही”, असं मलायका म्हणाली आहे. त्यामुळे मलायकाच्या ट्रोलर्सना तिच्या पोस्टवर कमेंट करताना दोनदा विचार जरूर करावा लागेल. कारण जर ती त्या कमेंट्स वाचत नसेल तर तुमचे कष्ट वाया जात आहेत.
काही दिवसांआधी मलायका तिच्या कपड्यांवरून ट्रोल झाली होती. मलायकाने पांढऱ्या रंगाचा एक शर्ट घातलेला. त्यावर तिने पिवळ्या रंगाचा स्वेटरही घातला होता. पण हा शर्ट आणि स्वेटर मोठा असल्यामुळे तिने घातलेली शॉर्ट दिसत नाही. पण हाच धागा धरत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. “तु घाई घाईत पॅन्ट घालायला विसरली आहेस का?” असा थेट प्रश्न एकाने विचारला.
मलायका तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष देते. त्यासाठी ती कधी योगा करताना दिसते तर कधी जीममध्ये वर्कआऊट करते. नेहमीप्रमाणे मयालका तिच्या पाळीव कुत्र्यासोबत मॉर्निंग वॉकला गेली होती. त्यावेळी तिने ग्रे कलरची ट्रॅक पॅण्ट आणि पांढऱ्या रंगाचं स्वेट-टी शर्ट घातलं होतं. कोरोनापासून बचावासाठी दोन मास्कही लावले होते. पण तिने ब्रा घातली नव्हती. तिचा असा हा ‘विदाऊट ब्रा’ लूकमधला फोटो एका फोटोग्राफरने काढला आणि तो फोटो वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला. आणि झालं… मलायका सोशल मीडियावर ट्रोल झाली होती.