इचलकरंजी व्यापारी सहकारी पतसंस्थेचा 15 टक्के लाभांश जाहीर


इचलकरंजी/प्रतिनिधी –
येथील इचलकरंजी व्यापारी सहकारी पतसंस्थेची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने पार पडली. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन व फोटो पूजन करून सभेची सुरुवात झाली. संस्थेचे ज्येष्ठ संचालक विलासराव गाताडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अहवाल सालात दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रध्दांजलीचा ठराव संचालक बाळासो बरगाले यांनी मांडला.
संस्थेचे चेअरमन सुर्यकांत साखरे यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेचा आढावा घेतला . गेली दोन वर्षे कोरोना सारखी गंभीर आपत्ती असुन देखील सभासदांच्या विश्‍वासाच्या जोरावर संस्थेने प्रगतीमध्ये सातत्य राखले आहे . संस्थेची थकबाकी नाममात्र असुन एनपीए शून्य टक्के आहे. संस्थेने सभासदांना सतत आठ वर्षे 15 टक्क्याप्रमाणे डिव्हिडंड दिला आहे. संस्थेचे स्वभांडवल 4 कोटी 4 लाख 28 हजार रुपये असुन ठेवी 13 कोटी 43 लाख 47 हजार इतक्या आहेत. संस्थेचे येणे कर्ज 9 कोटी 4 लाख 16 हजार इतके असुन 9 कोटी 81 लाख 38 हजार इतकी विविध बँकांमध्ये गुंतवणुक केली आहे. सर्व खर्च व तरतुदी वजा जाता संस्थेला अहवाल सालात 53 लाख 8 हजार इतका निव्वळ नफा झालेला आहे. संस्थेच्या कर्जाच्या विविध योजना सुरू असुन स्थावर तारण कर्ज 11 टक्के, सोनेतारण कर्ज 10 टक्के, सर्व प्रकारचे दुचाकी वाहन 12 टक्के तसेच 1 लाखाचे वरील वाहन कर्जासाठी 10 टक्केप्रमाणे आहे. सभासदांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
विषयपत्रिका वाचन संस्थेचे व्यवस्थापक विश्‍वनाथ रोडे यांनी केले. ऑनलाईन सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संस्थेचे व्हा . चेअरमन शशिकांत शेटके यांनी मानले. याप्रसंगी मर्चंटस् बँकेचे चेअरमन राजगोंडा पाटील, संचालक इरगोंडा पाटील, चंद्रकांत बिंदगे, राजेंद्र शिरगुप्पे, राजकुमार पाटील, गजानन लोंढे, जयप्रकाश शाळगांवकर, दशरथ मोहिते, पत संस्थेचे संचालक दिलीप वणकुंद्रे, सुभाष तोडकर, विलास कोरवी, विलासराव चव्हाण, सुरेंद्र हुक्केरी, नकुल झेले, सौ. छाया कोंडारे, सौ. लक्ष्मीबाई पाटील, तज्ञ संचालक सुभाष पाटील, संजय वठारे आदींसह ऑफिस स्टाफ व पिग्मी एजंट उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *