शाळा उघडल्यामुळे कोरोनाचा उच्छाद; सुमारे १.४१ लाख मुलं संक्रमित

अमेरिका येथे कोरोनाचा विषाणू लहान मुलांना शिकार करत आहे. अमेरिकेत कोरोना संक्रमित लहान मुलांचा वाढता आकडा हा जगासाठी धोक्याची परिस्थिती निर्माण करू शकते. अमेरिकेतील ‘अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स’च्या अहवालानुसार ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान १ लाख ४१ हजार ९०५ लहान मुलांना कोरोना झाल्याची पुष्टी झालेली आहे.

या अहवालानुसार लहान मुलांच्या कोरोना संक्रमणाची गती ही ३२ टक्क्यांनी वाढलेली आहे. आकडेवारीचा विचार केला तर अमेरिकेमध्ये मागील आठवड्यात एक तृतीयांश लहान मुले कोरोना संक्रमित झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. अमेरिकेमध्ये लहान मुलांची संख्या २२ टक्के आहे. कोरोना महामारीच्या जाळ्यात ३ टक्क्यांपेक्षाही कमी मुले संक्रमणीत झाले आहेत. त्यानुसार ६८ लाख मुले ही संक्रमित झालेली आहेत.

Open chat
Join our WhatsApp group