टेम्पो चालवून भंगार व्यवसाय, शालेय शिक्षण नाही, पण १ हजार ७४४ कोटींची संपत्ती !

बंगळूरच्या शहरी भागातून विधान परिषदेसाठी काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या उमेदवाराने शालेय शिक्षणही पूर्ण केलेले नाही. मात्र निवडणूक आयोगाला सुमारे १७०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. प्रतिज्ञापत्राची माहिती बाहेर येताच भंगार व्यापारी युसूफ शरीफ यांचे नाव सर्वांच्या जिभेवर आले.

युसूफ शरीफ हे डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार आहेत. युसूफ शरीफ यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात १७४४ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. ते अब्जाधीश उमेदवार आहेत. परंतु, 1993 मध्ये बंगळुरूजवळ कोलारमध्ये ते टेम्पो चालवत असे.

युसूफ शरीफ सांगतात की, आम्ही १४ भावंडं होतो, त्यामुळे आम्ही मध्येच शाळा सोडली आणि टेम्पो चालवायला सुरुवात केली, त्यानंतर भंगाराचा व्यवसाय केला आणि त्यानंतर रिअल इस्टेटचा व्यवसाय केला. युसूफ यांनी सांगितले की, मी भंगारातून सुरुवात केली, पण रिअल इस्टेटमधून पैसे कमावले. म्हणजेच भंगारातून लाखो आणि स्थावर मालमत्तेतून कोट्यवधींची कमाई झाली आहे. ते म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या आदेशाने मी विक्रीसाठी असलेली जमीन खरेदी करून विकतो.

Open chat
Join our WhatsApp group