मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत म्हणाले

ताजी बातमी ऑनलाईन टीम


दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घालणार्‍या ‘ओमिक्रॉन’ या नव्या कोरोना विषाणूचे संकट जगावर घोंघावू लागताच राज्य शासन सतर्क झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुखांना सुचना दिल्या आहेत. कोरोनाबाबत केंद्राकडून येणाऱ्या आदेशाची वाट न पाहता कामाला लागण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

बैठकीमध्ये मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा. लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील. विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी झालेल्या बैठकीत सुचना केल्या आहेत.

लसीकरण अत्यल्प असलेल्या देशांमध्येच ‘ओमिक्रॉन’ विषाणूचे थैमान सुरू झाले आहे, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने शनिवारी अनेक कडक नियम जारी केले. लोकांनी लस घ्यावी हा हेतू या नियमांमागे असून, लस न घेणार्‍या लोकांच्या दळणवळणावर या नियमांनी निर्बंध आणले आहेत.

Open chat
Join our WhatsApp group