सांगली : पेट्रोल, डिझेल, गॅसचा भयावह भडका

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. राज्य शासनाने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली असली तरी पेट्रोल अद्याप शंभरी पार, डिझेल शंभरी जवळ आहे. तर गॅस सिलिंडरने हजारी ओलांडली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. सांगली जिल्ह्यात सध्या पेट्रोल 105.97 रुपये, डिझेल 92.78 रुपयांवर आहे. इंधन दरवाढीची झळ असतानाच काही दिवसांपूर्वीच शासनाने गॅस सिलिंडरमध्ये देखील वाढ केल्याने गॅस सिलिंडर सध्या 1 हजार 80 रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता आता प्रवासासह गॅस दरवाढीला देखील महाग झाली आहे.गेल्या तीन वर्षांत सांगलीत पेट्रोलच्या दरांत 25 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. डिझेलचे दर 33 टक्क्यांनी वाढले आहेत. इंधन दरवाढीचा थेट परिणाम म्हणजे महागाईच्या वाढीत होत आहे. याचा ताण आता सर्वसामान्यांच्या खिशावर आल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षांची तुलना केली असता वाहनांच्या किमतीत देखील लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते.

Join our WhatsApp group